Fake Notes: एक कोटीच्या बनावट नोटांसह तिघे ताब्यात

भारतीय चिल्ड्रन बँकेच्या दहा लाखांच्या खेळण्यातील नोटांचा भाव एक लाख!
Fake Notes
एक कोटीच्या बनावट नोटांसह तिघे ताब्यातPudhari
Published on
Updated on

नगर: एक लाख रुपयांच्या खर्‍या नोटा घेऊन, त्याबदल्यात दहा लाख रुपयांच्या बनावट नोटा देणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी सापळा लावून जेरबंद केली. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून, पाच जण पसार आहेत. आरोपींकडून एक कोटीच्या बनावट नोटा जुत करण्यात आल्या आहेत.

दौंडकडून दोन कारमधून काही जण आणि दुचाकीवरून दोघे जण नगरमध्ये येऊन बनावट नोटांचा व्यवहार करणार असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना रविवारी (दि.24) माहिती मिळाली. (Latest Ahilyanagar News)

Fake Notes
Ahilyanagar: समाजकंटकांनी धार्मिक वास्तू तोडल्याने नगर शहरात तणाव; मुस्लिम समाजाचा पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

त्यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक हरीश भोये, कॉन्स्टेबल सुनील पवार, सुरेश माळी, दीपक घाटकर, हदय घोडके, भीमराज किसन खर्से, आकाश काळे, अमोल कोतकर, बाळू खेडकर, मनोज साखरे, चालक उमाकांत गावडे यांच्या पथकाने नगर-दौंड रोडवरील कायनेटिक चौक परिसरातील हनुमान मंदिराजवळ सापळा लावला.

संबंधित वाहने अडवली असता, त्यातील इंद्रजित बिभीषण पवार (वय 29), दीपक राजेंद्र भांडारकर (वय 32, दोघे रा. भोसरी, पुणे) व शरद सुरेश शिंदे (वय 29, रा. वरंवडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. मात्र मोटारसायकलवरील दोघे व अन्य एका कारमधील तिघे पळुन गेले. कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fake Notes
Shani Shingnapur: शनिशिंगणापूरमध्ये अलोट गर्दी; अमावस्येची पर्वणी साधत विकांनी घेतले शनिदर्शन

बनावट नोटा चलनात आणण्याची पद्धत

ही टोळी पुण्याची आहे. नोटांवर भारतीय चिल्ड्रन बँक असे नाव छापलेले आहे. ही नोट खेळण्यातील आहे. मात्र हिचा वापर फसवणुकीसाठी केला जातो. 500 रुपये किंवा 200 रुपयांच्या 100 नोटांच्या बंडलमध्ये वर आणि खाली काही खर्‍या नोटा, तर मध्ये बनावट नोटा वापरल्या जातात. ग्राहक रबर-बँड-बांंधलेले असतानाच नोटा मोजतात, यावेळी त्यांना फक्त कागद आणि रंग खरा असल्याचे दिसते. मात्र या बनावट नोटांना चुना आणि रसायन वापरलेले असते. त्यामुळे ही नोट अगदी नोटा मोजण्याच्या मशीनमध्येही ‘खरी’ म्हणून बाहेर पडते.

पसार आरोपींमध्ये एक जण पारनेरचा

ताब्यातील आरोपींनी पळून गेलेल्यांपैकी एकाचे नाव जितेंद्र ममता साठे (रा. वासुंदे, ता. पारनेर) असे सांगितले. इतर चौघांना ते ओळखत नाहीत. त्यांची एक गँग असून ते नेहमी बनावट नोटा खर्‍या भासवून फसवणूक करतात, असे समजले.

कोपरगावातही बनावट नोटा व्यवहारात

आरोपींनी दोन दिवसांपूर्वी कोपरगाव येथे सुमारे 7 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा दिल्याचे सांगितले. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल, तर त्यांनी संबंधित पोलिस स्टेशनला तक्रारी देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नोटांवर ‘भारतीय बच्चोंकी बँक’

जप्त केलेल्या मोटारीत 500 रुपयांच्या हुबेहूब 9 लाख 57 हजार रुपये किमतीच्या नोटा आढळल्या. या नोटेवर ‘भारतीय बच्चो का बैंक, 500 रुपये’ असे छापलेले आढळले. प्रत्येक बंडलमध्ये 100 कागदी नोटा असलेले 12 बंडल, तसेच 88 भारतीय बच्चो का बैंक, 500 रुपये असे छापलेले बंडल त्यातील प्रत्येक बंडलमध्ये 100 कागदी नोटा, तसेच 20 भारतीय बच्चो का बैंक 200 रुपये असे छापलेले बंडल, त्यातील प्रत्येक बंडलमध्ये 100 कागदी नोटा आढळल्या. पोलिसांनी कार, मोटारसायकल व चार मोबाईलसह सर्व नोटा जप्त केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news