Farmers Wating for Rain
चिंचपूर पांगूळ: यावर्षी मेमध्येच अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे बहुुतांस शेतकर्यांनी मेच्या शेवटच्या तर उर्वरित शेतकरयांनी जूनच्या पहिल्याच आठवड्यात खरीप हंगामातील मूग, कापूस, बाजरी, उडीद, तूर, सोयाबीन अश्या अनेक प्रकारच्या नगदी पिकांची पेरणी केली. परंतु पंधरा दिवसापासून पाऊस न पडलयाने पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Latest Ahilyanagar News)
यावर्षी मान्सूनचे आगमन जरी लवकर झाले असले तरी, पाथर्डी तालुक्यातील अनेक ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तालुकयातील करोडी, टाकळी मानूर, चिंचपूर पांगूळ, जोगेवाडी व पंचक्रोशीतील भागात अद्यापि शेतकरी जोरदार पावसाची वाट पाहत आहेत.
पुढील आठ दिवसांत पुरेेशा पाऊस जर पडला नाही, तर, शेतकर्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढावू शकते. परिसरात जोरदार पाऊस पडावा, यासाठी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.