नेवासा: ढगाळ व रोगट हवामानामुळे नेवासा तालुक्यात सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. खासगी दवाखान्यांत रुग्णांची गर्दी दिसत आहे. सर्दी, खोकल्यांच्या रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. नेवाशात साथीचे आजार वाढू लागले.
सध्या पावसाळी ऋतू सुरू आहे, परंतु पाऊस पडण्याऐवजी फक्त ढगाळ वातावरण आहे. धड पाऊसही पडत नाही आणि ऊनही नाही, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे डासांची उत्पती वाढली आहे. सर्दी, खोकला, ताप या आजारांनी डोके वर काढले असून, रोज शेकडो नागरिक आजारी पडत आहेत. नेवासा तालक्यात सध्या सर्दी व खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी लहान मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. (Latest Ahilyanagar News)
सकाळी गार आणि दुपारी गरम असे वातावरण असल्याने लोक आजारी पडत आहेत. सर्दी, खोकला, ताप तर दर 10-15 दिवसांनी परत-परत येतो. सर्दी-खोकला झाल्यानंतर चार-पाच दिवसांमध्ये बरा होत नाही, तर तो 10-15 दिवस रेंगाळतो. ताप येतो. डोकेदुखी, अंगदुखीदेखील असते. त्यामुळे परीक्षेच्या दिवसांत मुले आजारी पडत असल्याच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जाणार्या पालकांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे.
यावर एक प्रभावी उपाय म्हणजे, औषध बदलून देणे, हा असल्याचेही तज्ज्ञ सांगतात. वातावरणात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढतो. असे विषम वातावरण वेगवेगळ्या विषाणूंसाठी पोषक असते.
त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढतात. लहान मुलांमध्ये बदलत्या वातावरणाला प्रतिकार करण्याची क्षमता कमी असते. त्यातून ही मुले आजारी पडतात. साधारणतः 10 ते 15 दिवसांत ही मुले बरी होतात. सध्या तालक्यात सर्दी व खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी लहान मुलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
डॉक्टरांनी लोकांना विशेषतः लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या वाढत्या सर्दी-खोकल्याच्या समस्यांमुळे, लोकांना विषाणूजन्य संसर्गाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना त्वरित भेटणे महत्त्वाचे आहे.
सर्दी-खोकला सामान्यत: विषाणूमुळे होतो, जो हवेतून किंवा आजारी व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो. आजारी असलेल्या लोकांना सर्दी संसर्ग होऊ शकतो. ऋतू बदलताना किंवा वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास वाढू शकतो.- डॉ. अविनाश काळे