Kharif Crop Damage Pudhari
अहिल्यानगर

Farmers Problems During Drought: दुष्काळात शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी; पंचनामेही स्वतःच करा, प्रशासनाचे नवे संकट!

ई-पीक पाहणी, पीक नुकसानीचे फोटो अन् एसआयआरच्या कागदपत्रांचा ताण; आर्थिक संकटात बळीराजा हैराण

पुढारी वृत्तसेवा

नगर: सध्या निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करणाऱ्या बळीराजासमोर प्रशासकीय अटी व शर्तींचे नवे संकट उभे ठाकले आहे. एकीकडे दुष्काळ आणि बाजारातील शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला आहे; तर दुसरीकडे 'एसआयआर', पीक पेरा आणि पीक नुकसानीचे पंचनामेही स्वतः शेतकऱ्यालाच करावी लागत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. प्रशासकीय यंत्रणा टेबलवर बसून, सांगत फोटो, कागदपत्रे घेऊन या त्यामुळे शेतकरी चोहीबाजूने अडचणीत सापडला आहे.

जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. खरीपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. सोयबीन, मूग, उडीद, तूर, बाजरी, कापूस ही पिके जागेवर करपून गेली आहे. तर, फळ बागांना पाणी कमी पडू लागल्याने त्याही जागेवर जळू लागल्या आहे. सरकारने राज्यात दुष्काळी जाहीर केला आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे सुरू झाले आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे करण्यास शासनाच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही. शेतकऱ्याला स्वचः पिक नुकसानीचे पंचनामे करावे लागत आहेत.

नुकसानीच्या भरपाईसाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाकडून विविध मोबाईल ॲप्स व ऑनलाईन प्रणाली सक्तीची करण्यात आली आहे. परंतु, ग्रामीण भागात नेटवर्कचा तुटवडा, अँड्रॉइड फोनचा अभाव व तांत्रिक ज्ञानाची उणीव यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे अत्यंत कठीण जात आहे. त्यातच आता नुकसानीचे पंचनामेही शेतकऱ्यांनी स्वतःच मोबाईलद्वारे फोटो काढून अपलोड करावेत, असा कारभार सुरू झाल्याने महसूल व कृषी विभागाचे अधिकारी नक्की करतात तरी काय? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.

दुसरीकडे सध्या निवडणूक आयोगाकडून एसआयआरचा कार्यक्रम सुरू आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांची नावे वगळली आहे. वृद्ध शेतकरी, महिला शेतकरी यांचीही नावे कागदपत्रांची पूर्तता न केल्याने वगळली आहे. आता त्यांची सुनावणी सुरू आहे. अनेकांकडे कागदपत्रे नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. अधिकारी मात्र कागदपत्रे असल्याशिवाय नोंदणी करण्यास तयार नाहीत. अशा सगळ्याच बाजूंनी शेतकऱ्यांची हेळसांड सुरू आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक विंवचनेत सापडला आहे. त्यात शासन पुन्हा शेतकऱ्यांची सगळीकडून कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. अगोदर एसआयआरला शेतकरी सामोरे गेला. आता ई-पीक पाहणी आणि पीक नुकसानीचे पंचनामेही स्वतःच करावे लागत आहेत. ग्रामपंचायत कार्यालय शेतकऱ्यांना मदत करीत नाही. तर, शासकीय यंत्रणेला शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यास वेळ नाही.
घनश्याम गिरवले, शेतकरी, देऊळगाव सिद्धी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT