District Bank Pudhari
अहिल्यानगर

District Bank Chairman Election: जिल्हा बँक अध्यक्षाची आज निवड

संचालक मंडळाची बैठक सकाळी 11 वाजता, राष्ट्रवादी-आघाडीतील उमेदवारांचा सस्पेन्स कायम

पुढारी वृत्तसेवा

नगर : जिल्हा बँकेची रिक्त झालेल्या चेअरमन निवडीसाठी आज सोमवारी (दि.24) संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवार दिला जाणार असल्याचे समजते. मात्र, महायुतीतील ज्येष्ठ संचालकाने अजुन कोणाचेही नाव ‌‘फायनल‌’ नसून, बैठकीतच निर्णय होणार असल्याचे सांगत सस्पेन्स कायम ठेवला.

जिल्हा बँकेच्या 2021 मधील सार्वत्रिक निवडणुकीनंतर उदय शेळके चेअरमन झाले होते. त्यांच्या निधनानंतर शिवाजीराव कर्डिले चेअरमन झाले. या निवडीत आघाडीकडे 14 संख्याबळ होते. मात्र मतदान प्रक्रियेत चार मते फुटली. एक बाद झाले. त्यामुळे भाजपाचे शिवाजीराव कर्डिले (10) यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले (9) यांचा अवघ्या एका मताने पराभव केला होता.

दरम्यान, शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर चेअरमन पदासह संचालक पदही रिक्त झाले आहे. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार रिक्त जागा भरणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली आज सोमवारी सकाळी 11 वाजता संचालक मंडळाची बैठक पार पडणार आहे.

या बैठकीसाठी संचालक विवेक कोल्हे, मोनिका राजळे, आण्णासाहेब म्हस्के, अंबादास पिसाळ, अमोर राळेभात, आशा तापकीर, भानुदास मुरकुटे, सीताराम गायकर, अरूण तनपुरे, चंद्रशेखर घुले, राहुल जगताप, आशुतोष काळे, प्रशांत गायकवाड, अनुराधा नागवडे, अमित भांगरे, गीतांजली शेळके, माधवराव कानवडे, करण ससाणे, गणपतराव सांगळे, शंकरराव गडाख यांना अधिकृत अजेंडा पाठविण्यात आला आहे.

सकाळी ‌‘यश पॅलेस‌’वर चहापान

सोमवारी सकाळी 9 वाजता नगरमधील राज पॅलेसवर संचालक मंडळांची एकत्रित चहापान बैठक बोलाविण्यात आल्याचेही एका संचालकाने सांगितले. त्यामध्ये चेअरमनच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर सर्व संचालक हे बँकेत जातील. त्या ठिकाणी पुढील प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या बैठकीसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यासह आणखी कोण कोण उपस्थित राहणार, हे समजू शकलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT