सोनई: शनिशिंगणापूर येथे शनिभक्तांनी श्रावण महिन्याच्या तिसर्या शनिवारची पर्वणी साधत भक्तांनी स्वयंभू शनि मूर्तीला मनोभावे स्नान घातले. रक्षाबंधन सण व पावसाचं वातावरण असल्याने भक्तांची संख्या श्रावणी शनिवारच्या तुलनेत कमीच होती.
श्रावण महिन्यात देवस्थानने दोन तासांकरिता चौथर्यावर जाऊन शनिमूर्तीवर जलाभिषेक करण्यासाठी चौथरा खुला केल्याने पहाटे पाच ते सात यावेळेस भक्तांनी शनी चौथर्यावर जाऊन जलाभिषेक केला. (Latest Ahilyanagar News)
शनिवारी पहाटेपासूनच परिसरातील शनिभक्त पायी दर्शनाला येत होते. त्यात रक्षाबंधन असल्याने रस्ते गर्दीने फुलून गेले होते. घोडेगाव व सोनई परिसरात वाहनांंच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. देवस्थानच्या वतीने जलाभिषेक करणार्यांकरिता स्वतंत्र स्थान जलपत्र, आरोग्य सेवा व प्रसादाचे नियोजन केले होते. शिंगणापूरचे पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी पथकासह चोख बंदोबस्त ठेवला होता.