उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विखे रविवारी संगमनेरात File Photo
अहिल्यानगर

Eknath Shinde Sangamner visit: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री विखे रविवारी संगमनेरात

महायुतीचा मेळावा, जनसंपर्क कार्यालय उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: आमदार अमोल खताळाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व महायुतीचा मेळावा रविवारी (दि.24) उपमुख्यमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

अमोल खताळ यांच्या रूपाने संगमनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. त्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला आपल्या समस्या आणि अडचणी मांडण्यासाठी हक्काचे ठिकाण असावे, यासाठी आमदार अमोल खताळ व महायुती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिवसेनेचे संपर्कमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, माजी खा डॉ. सुजय विखे पा, आमदार विठ्ठलराव लंघे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आ. भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे, उत्तर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नितीन औताडे, दक्षिण जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, अनिल शिंदे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुनिता शेळके, दक्षिण जिल्हा प्रमुख विमल पुंडे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार यांच्यासह महायुतीचे जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. (Latest Ahilyanagar News)

आमदार अमोल खताळ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाल्यानंतर कार्यालयापासून जाणता राजा मैदानापर्यंत शिवसेना महायुती पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे. हे विधानसभेच्या निवडणुकीत आमदार अमोल खताळ यांना जनतेने आशीर्वाद दिल्याबद्दल जाहीर सभेच्या माध्यमातून संगमनेरकर जनतेचे आभार मानणार आहेत. तरी या जाहीर सभेसाठी संगमनेर शहर आणि तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT