Saibaba Silver Paduka Theft Pudhari
अहिल्यानगर

Sangamner Saibaba Silver Paduka Theft: चंदनापुरी येथे साईबाबांच्या चांदीच्या पादुकांची चोरी; 1.82 लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर पोलिसांची शिताफी; श्रीरामपूरातून तीन आरोपी अटकेत

पुढारी वृत्तसेवा

घारगाव: संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे पठार भागातील घारगाव येथून शिर्डी येथे जाण्यासाठी पायी दिंडी साई पालखीत साई बाबांच्या चांदीच्या पादुका घेऊन मुक्कामी आले होते. पहाटे 3 वाजताच्या सुमारास चांदीच्या पादुका व एक भक्ताचा मोबाईल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, संगमनेर तालुका पोलिस पथकाने मोठ्या शिताफीने तपासाची चक्रे फिरवून 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमालासह श्रीरामपुरातून तीन आरोपींना ताब्यात घेतले.

गुरुवार दि.29 जानेवारी रोजी घारगाव येथून 100 पेक्षा जास्त महिला व पुरुष हे शिर्डी येथे जाण्याकरिता साईबाबांची पालखी घेऊन पायी दिंडीव्दारे निघाले होते. सायंकाळी 7 वाजता चंदनापुरी येथील साई मंदिरात मुक्कामासाठी ते थांबले. यावेळी साईबाबांच्या पालखीसह चांदीच्या पादुका व दानपेटी असे साईमंदिरातील गाभाऱ्यात ठेवून नंतर आरती केली. सर्व भक्तगण जेवण करून मंदिर बंद करत परिसरात झोपले.

या दरम्यान शुक्रवार दि.30 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजेचे सुमारास पायी दिंडीतील भक्त सखाराम कुरकुटे यांना जाग आली. यावेळी त्यांनी मंदिराचा दरवाजा उघडा पाहिला. पालखीमध्ये ठेवलेल्या चांदीच्या पादुका व शेजारी ठेवलेली दानपेटी चोरी गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी महेश आहेर यांना उठविले. त्यांनी दिंडीतील सर्वांना जागे करत चोरी झाल्याचे सांगितले. यानंतर सर्वांनी पादुका व दानपेटीचा शोध घेतला असता दानपेटी ही काही अंतरावर रस्त्याचे कडेला तोडलेल्या अवस्थेत मिळुन आली.परंतु पादुका कोठेही मिळुन आल्या नाही. तसेच संजय गाडेकर या भक्ताचा मोबाईल देखील चोरी गेल्याचे त्यांनी सांगितले.असा एकूण 23 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला. सखाराम कुरकुटे व संजय गाडेकर यांच्या तक्रारीनुसार संगमनेर तालुका पोलिस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गुन्ह्याचे तपासात कुठलाही धागा दोरा नसताना अनोळखी इसमांची ओळख पटवुन त्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान संगमनेर तालुका पोलिसांसमोर होते. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासाचे चक्र फिरवत अनोळखी इसमांचा शोध होणेकामी पोलिस पथक तयार करुन शोधकार्य सुरू करण्यात आले. गुन्ह्याचे तांत्रिक विलेषण करुन व गुप्त बातमी दारामार्फत अज्ञात आरोपींचा शोध घेतला असता आरोपी चोरी करुन वार्ड क्र.2 श्रीरामपूर येथे राहत असल्याची माहीती मिळाली.

श्रीरामपुरमध्ये घेतला आरोपींनी आश्रय

श्रीरामपूर येथे पोलिस पथकाने सापळा लावुन मोठ्या शिताफाने तीन आरोपी ताब्यात घेतले आहे. यातील आरोपी प्रशांत दीपक मावस रा. खांडगाव, गणेशवाडी, ता. संगमनेर याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. तर रोहीत विठ्ठल साळवे रा. जोशीवाडी, बिल्लोरी ता. सिन्नर जि. नाशिक व आतुल संजय बटवाल रा. राजापुर रोड, ढोलेवाडी.ता संगमनेर यांना ताब्यात घेतले. आरोपींनी चोरी केल्याची कबुली दिली.

संगमनेरातील सोनाराला विकल्या पादुका

गुन्ह्यातील चांदीच्या पादुका ह्या संगमनेर येथील सोनार सिध्देश संदिप महाले रा. संगमनेर यास विक्री केले आहे. यादरम्यान या तिन्ही आरोपींना अटक करत 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी चंदनापुरी घाटामध्ये चालक हरिष सोनार रा. सिन्नर जि. नाशिक यास कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT