Shevgaon Murder Case Verdict: शेवगाव गायके खून खटला : तिघांना जन्मठेप, जिल्हा न्यायालयाचा निकाल

भावकीतील वादातून झालेल्या खुनप्रकरणी तिघे दोषी; प्रत्येकी सात हजार रुपयांचा दंड
life imprisonment
life imprisonmentPudhari
Published on
Updated on

नगर: शेवगाव तालुक्यातील गायके यांच्या खून खटल्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन आरोपींना दोषी धरीत खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये जन्मठेप व प्रत्येकी सात हजारांच्या दंडाची शिक्षा केली. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एच. शेख यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. जालिंदर आसाराम गायके (वय 50), बाळासाहेब आसाराम गायके (वय 46), तुकाराम ज्ञानदेव गायके (वय 42, सर्व रा. बेलगाव, ता. शेवगाव जि. अहिल्यानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

life imprisonment
Ahilyanagar Agriculture Festival: अहिल्यानगरात 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान भव्य ‘कृषीपर्व’ कृषी महोत्सव

बाळासाहेब आश्रू गायके असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत नानासाहेब बाळासाहेब गायके यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी व त्यांचे वडील हे मजुरी काम करून कुटुंबाची उपजीविका करीत होते. 4 मे 2019 रोजी दुपारी फिर्यादी आणि त्यांचे वडील काम संपवून मोटारसायकलवरून घरी जात होतो. त्या वेळी चापडगाव शिवारात त्यांच्या भावकीतील आरोपींनी व अनोळखी व्यक्तींनी त्यांना वाईट-वाईट शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

life imprisonment
Nevasa Municipal Dispute: नेवासा नगरपंचायतीत गोंधळ; उपनगराध्यक्ष व नगरसेवकांवर गुन्हा दाखल

आरोपी जालिंदर गायके यांनी कुऱ्हाडीने फिर्यादी यांच्या डोक्यात वार केला. आरोपी रामदास गायके व गणेश गायके यांनी त्याच्या हातातील लोखंडी गजाने फिर्यादीच्या पायावर मारून दुखापत केली. फिर्यादीचे वडील बाळासाहेब अश्रू गायके यांना जालिंदर आसाराम गायके व तुकारात नामदेव गायके यांनी त्यांच्या हातातील कुऱ्हाडीने डोक्यात मारून जबर दुखापत करून जिवे मारण्याची धमकी दिली.

life imprisonment
Karjat City Naming: कर्जत शहराचे नामकरण संत सद्गुरू गोदड महाराजनगर करण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचा आंदोलन

फिर्यादी व त्यांच्या वडिलांना लोकांनी पाथर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचाराकामी त्यांना सिटी केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या जबाबानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उपचारादरम्यान, फिर्यादीच्या वडिलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले.

life imprisonment
Ramnath Rajpure Attack Protest: बालमटाकळीतील माजी सभापती रामनाथ राजपुरेवर हल्ल्यानंतर ग्रामस्थांची निषेधसभा

या खटल्यात सरकार पक्षातर्फे 17 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीपैकी दोघे विधिसंघर्षित बालके होती. तर, अन्य दोन आरोपींना संशयाचा फायदा घेत निर्दोष मुक्त केले. अन्य आरोपीविरोधात आलले साक्षी पुरावे व सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तीन आरोपींना दोषी धरून त्यांना वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी बाजू मांडली. त्यांना पैरवी अधिकारी सहायक फौजदार दत्तात्रय बेरड, पोलिस अंमलदार अशोक बेळगे यांनी सहाय्य केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news