संगमनेर : उजव्या कालव्यात पाईप टाकून पाणी उचलल्याने उद्धवलेल्या प्रकरणात थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईने शेतकर्यांमध्ये प्रचंड संताप पसरला असून, आम्हालाही सहआरोपी करा, अशी मागणी करत शेतकर्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. (Ahilyanagar News Update )
निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यात सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. जलसंपदा विभागाने कालव्यातील अनधिकृत पाईप काढण्यास सुरुवात केली असता, शेतकर्यांनी याला त इंद्रजीत थोरात यांनी शेतकर्यांचे नेतृत्व करत प्रशासनाच्या कारवाईला आव्हान दिले. जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रमोद माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नीमगाव पागा ते खळी पिंपरी दरम्यान अनधिकृत पाईप काढताना इंद्रजीत थोरात यांनी अटकाव केला. थोरात यांनी, आमच्या कारखान्याने पाईप टाकले आहेत, ते काढू नका. शेतकर्यांच्या जमिनी कालव्यासाठी गेल्या, त्यांना आधी पाणी द्या, असे सांगितले. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्याने शेतकर्यांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली जात आहे.
कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाने संगमनेर तालुक्यातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. शेतकर्यांचा उद्रेक आणि आंदोलनाची तयारी यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि शेतकर्यांमधील तणाव कसा निवळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.