Police Pudhari
अहिल्यानगर

Bhenda Theft Police Controversy: भेंड्यात चोरी प्रकरणात पोलिसांवर प्रश्नचिन्ह; पकडलेला चोरटा सोडल्याचा आरोप

स्वागत हॉटेलमध्ये चोरीनंतर रंगेहात पकडला आरोपी; कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

भेंडा: भेंडा बसस्थानक परिसरातील स्वागत हॉटेलमध्ये चोरी करून बाहेर पडलेल्या चोरट्यास रंगेहात पकडून कारखाना सुरक्षारक्षकांनी कुकाणा पोलिसांच्या हवाली केले. मात्र, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल न करता त्यास लगेच सोडून का दिले, असा सवाल सुनील गव्हाणे यांनी केला आहे. पोलिसांच्या या भूमिकेबाबत भेंड्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दि. 18 रोजी रात्री बसस्थानक चौकातील स्वागत हॉटेलमध्ये स्वयंपाक घरातील एक्झॉस्ट फॅनच्या खिडकीतून एक चोरटा आत घुसला. त्याने गल्ल्यातील काही चिल्लर, नोटा, मोबाईल व साहित्याची चोरी केली. तो हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर कारखाना ए टाईप वसाहतीच्या सुरक्षा रक्षकाच्या हे लक्षात आले. त्याने इतर सुरक्षारक्षक मदतीला बोलावून त्याचा पाठलाग करून त्यास पकडले.

हॉटेलमध्ये चोरी केल्याचे त्याने कबूल केले. त्याच्याकडे नोटांचे बंडल, चिल्लर व एक मोबाईल आढळला. कुकाणा पोलिसांना संपर्क केल्यानंतर ते घटनास्थळी येत त्यास ताब्यात घेतले. हॉटेल स्वागतचे मालक सुनील गव्हाणे हे ही घटनास्थळी आले.

आपली चिल्लर नोटा व हॉटेलमध्ये ग्राहकाचा ठेवलेला मोबाईल ओळखला. कुकाणा पोलिस दूरक्षेत्रास न नेता काही वेळाने पोलिसांनी कारवाई न करता त्याला भेंड्यातच सोडून दिले. पोलिसांच्या या वर्तनामुळे कारखाना सुरक्षा रक्षक नाराज झाले. यापूर्वी बसस्थानक परिसरातील चोऱ्या झाल्या. त्याचा तपास पोलिस लावू शकले नाहीत.

हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दाखविले. .चोरी केल्यानंतर मुद्देमालासह पकडलेल्या चोरट्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र त्यास पोलिसांनी का सोडून दिले, याचे कोडे उलगडले नाही.
सुनील गव्हाणे, भेंडा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT