बोधेगाव: शेवगाव तालुक्यातील सोनविहीर येथील प्राथमिक शाळेमध्ये शनिवारी बालआनंद बाजार मेळावा उत्साहात पार पडला. शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची जोड मिळावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वनिता अरुण मडके यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच दिलीप विखे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन बळीराम विखे, बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष संभाजी तिडके, तसेच विकास विखे, राजेंद्र विखे, सुखदेव विखे, श्री हरुण शेख, बाबासाहेब शिंदे, सुभाष रोडगे, हरिभाऊ दादा विखे, असलम बेग, रामभाऊ डोंगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गोकुळ टेमकर, ज्ञानेश्वर विखे, महादेव रोडगे, कृष्णा विखे, बाळासाहेब विखे, परमेश्वर विखे, श्री अरुण मडके, गणेश डोंगरे, राजेंद्र शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब टेमकर, अंगणवाडी सेविका रुक्मिणी विखे, गीताराम विखे, इस्लाम बेग, अशोक मामा विखे, रवी विखे, विविध कार्यकारी सोसायटीचे माजी व्हाइस चेअरमन रानोजी अवचिते, जनाआत्या पोटभरे, श्री देविदास शिंदे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या व विक्रीस ठेवलेल्या विविध खाद्यपदार्थ व वस्तूंचे स्टॉल लावले होते. यामध्ये चहा, वडापाव, सामोसे, पोहे, पाणीपुरी, तसेच भाजीपाला, कोथिंबीर, वांगे, नारळ, लिंबू, कडीपत्ता, बोरे आदींचा समावेश होता.
या बाजारात चांगली आर्थिक उलाढाल झाली असून, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारातून व्यावसायिक व आर्थिक ज्ञानाचा अनुभव मिळाला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक भागवत घुले, शिक्षक रामेश्वर जावळे व विशाल दुसंग यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वनिता मडके म्हणाल्या, बालआनंद बाजारासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यावहारिक ज्ञानाला चालना मिळते. अशा कार्यक्रमांतून मुलांची सर्जनशीलता, आत्मविश्वास व संस्कार घडतात.