Ashok Kharat  pudhari
अहिल्यानगर

Ashok Kharat: समता पतसंस्था घोटाळ्यात भोंदू अशोक खरात न्यायालयीन कोठडीत; शिर्डी पोलिसांच्या ताब्याची तयारी

ईडी चौकशीत आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे उघड; बोगस खात्यांच्या तपासासाठी ताबा मिळण्याची शक्यता, एसआयटीकडे गुन्हा जाण्याची चर्चा

पुढारी वृत्तसेवा

नगर: भोंदू अशोक खरात याची ईडीची कोठडी काल संपली. त्यामुळे त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. इकडे शिर्डी पोलिसांकडून राहाता न्यायालयात खरातला ‌‘समता‌’च्या गुन्ह्यात वर्ग करण्यासाठी गुरुवारी अर्ज सादर केला जाणार असल्याचे समजते. त्यानंतर खरातचा शिर्डी पोलिसांना ताबा मिळून, या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला जाणार असल्याचे सांगितले जाते.

ईडीनेखरात याला दि. 19 मे रोजी ताब्यात घेतले होते. त्यानंतर विशेष न्यायालयाने त्याला कोठडी दिली होती. दि. 26 मे पर्यंत ही ईडीची कोठडी होती. या कालावधीत खरातचे आर्थिक व्यवहाराबाबतही बारकाईने तपास केला जात होता. यामध्ये ‌‘समता‌’ पतसंस्थेतील बोगस खात्यांबाबतही मोठा उलगडा झाला. राहाता शाखेच्या मॅनेजरच्या सांगण्यावरून ही खाते आपण उघडली होती, अशी त्याने कबुली दिली होती. त्यामुळे खरातला शिर्डी पोलिसांनी ‌‘समता‌’च्या गुन्ह्यात वर्ग केल्यानंतर आणखी किती संस्थांपर्यंत आणि संस्था चालकांपर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे पोहचणार, याकडे लक्ष लागले आहे.

दि. 9 जूनपर्यंत्त खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, शिर्डी पोलिसांकडून खरातला बोगस खात्यांच्या गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. बकरी ईदमुळे दोन दिवस पोलिस बंदोबस्ताच्या कारणाने गुरुवारी राहाता कोर्टात तसा अर्ज सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरातचा ताबा शिर्डी पोलिसांना मिळणार आहे.

‌‘समता‌’चा गुन्हा एसआयटीकडे वर्ग होणार?

भोंदू खरात प्रकरणात शिर्डी पोलिसांनी सुरुवातीपासूनच कौतुकास्पद तपास केलेला आहे. ‌‘समता‌’च्या बोगस खात्यांबाबतही शिर्डी पोलिसांनीच जबाब नोंदवले आहेत. असे असताना खरातचा ताबा मिळण्यापुर्वीच हा गुन्हा ‌‘एसआयटी‌’कडे वर्ग करण्याच्याही हालचाली सुरू असल्याची दबकी चर्चा आहे. त्यामुळे ज्या एसआयटीकडे फक्त महिलांचा तपास होता, त्यांच्याकडे ‌‘समता‌’चा तपास सोपवला जाणार का, हा प्रश्न उभा राहिला आहे.

सहकार विभागाचा अहवाल कुठयं?

सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी ‌‘समता‌’ पतसंस्थेच्या बँक खात्यांची ई केवायसी तसेच आर्थिक व्यवहार तपासून, त्याचा 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमली होती. मात्र दीड महिला उलटून गेला तरीही चौकशी आणि त्याचा अहवाल गुलदस्त्यात आहे. अजुनही तपास पूर्ण झालेला नाही. त्यामुळे या तपासाविषयीही संशयाने पाहिले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT