Akole Municipal President Election Pudhari
अहिल्यानगर

Akole Municipal President Election: अकोल्यात सोनाली नाईकवाडी पुन्हा नगराध्यक्ष; ११-६ मतांनी वैष्णवी धुमाळ यांचा पराभव

भाजपमधील अंतर्गत समीकरणांना कलाटणी; परशराम शेळके ठरले 'किंगमेकर', शहर विकासाला प्राधान्य देण्याची नाईकवाडींची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

अकोले: अकोल्यात भाजप महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सोनाली नाईकवाडी यांनी भाजपच्याच माजी आमदार वैभव पिचड गटाच्या वैष्णवी धुमाळ यांचा ११ विरुद्ध ६ मतांनी पराभूत करत दुसऱ्यांदा नगराध्यक्षपद मिळवले.

अकोले नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली १७ नगरसेवकांच्या उपस्थितीत झाली. त्यांना मुख्यधिकारी धनश्री पवार यांनी साह्य केले. नगरसेवकांनी हात उंचावून आवाजी मतदानाने ही निवड केली. भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सचिव तथा भाजपाच्या बंडखोर गटाच्या नेत्या सोनाली नाईकवाडी यांच्यासाठी नगरसेवक हितेश कुंभार, सागर चौधरी, नवनाथ शेटे, आरिफ शेख, कविता शेळके, प्रतिभा मनकर, जनाबाई मोहिते, तमन्ना शेख, विमल मंडलिक, श्वेताली रुपवते व स्वतः सोनाली नाईकवाडी अशी ११ नगरसेवकांनी जणांनी हात उंचावून मतदान केले.

पिचड गटाच्या वैष्णवी सावंत यांच्यासाठी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उपनगराध्यक्ष शरद नवले, नगरसेवक प्रदीपराज नाईकवाडी, शीतल वैद्य, माधुरी शेणकर, वैष्णवी धुमाळ यांनी हात उंचावून मतदान केले. सोनाली नाईकवाडी यांची ११ विरुद्ध ६ मतांनी नगराध्यक्षपदी निवड झाल्याचे पीठासन अधिकारी अरुण उंडे यांनी जाहीर केले.

परशराम शेळके ठरले किंगमेकर!

नगरसेवक बाळासाहेब वडजे यांना यापूर्वी उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेविकेचे पती परशराम शेळके हेच नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्यावर अविश्वास आणण्यात व सोनाली नाईकवाडी यांना नगराध्यक्ष करण्यात किंगमेकर ठरले. त्यांनी गेले दीड वर्ष संघर्ष करत सर्व नगरसेवकांना एकत्रत करून व्यूहरचना केली, तसेच सुरुवातीला भाजपातील १२ पैकी ८ नगरसेवकांचा गट करून गटनेता आपल्यातील केला. त्यामुळे पुढे अविश्वास व नगराध्यक्ष बदल करत नूतन नगराध्यक्ष निवडीत शेळके किंगमेकर ठरल्याचे बहुतांश नगरसेवकांनी बोलून दाखवले.

आम्ही भाजपाचेच असून आम्ही सर्व एक आहोत. आता फक्त अकोले शहराचा विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. आम्हाला वेळ कमी आहे. त्यात जास्तीत जास्त काम करायचे आहे.
सोनाली नाईकवाडी, नूतन नगराध्यक्ष, अकोले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT