Child Marriage Free District Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Child Marriage Free District: महिला वकिलांचा हळदी-कुंकू सोहळा; अहिल्यानगर बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प

जिल्हा न्यायालय परिसरात सामाजिक बांधिलकीतून बालविवाहविरोधी शपथ

पुढारी वृत्तसेवा

नगर: अहिल्यानगर येथील जिल्हा न्यायालय परिसरात महिला वकिलांचा पारंपरिक हळदी-कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात व सामाजिक बांधिलकीच्या भावनेत पार पडला. या सोहळ्यात उपस्थित सर्व महिला वकील व पोलिस अधिकारी यांनी बालविवाह मुक्त भारत घडविणे या उद्देशाने अहिल्यानगर जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प करीत शपथ घेतली.

जिल्हा न्यायालयातील हळदी कुंकवाचा कार्यक्रम बाल कल्याण समितीच्या सदस्या ॲड. अनुराधा दिनेश येवले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वंदना फाटके पाटील-जगताप उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर सहायक पोलिस निरीक्षक पूनम श्रीवास्तव, ॲड. स्वाती पाटील, ॲड. जया पाटोळे, ॲड. मनीषा केळगंद्रे, ॲड. मनीषा डुबे पाटील, ॲड. सुजाता कोठारी, ॲड. बागेश्री जरंडिकर, सचिव ॲड. सारिका झरेकर, सदस्य ॲड. प्राजक्ता करांडे आदी उपस्थित होते.

या सोहळ्यात ॲड. अनिता दिघे, ॲड. वृषाली तांदळे, ॲड. भक्ती शिरसाट, ॲड. अर्पिता झरेकर, ॲड. मनीषा पंडुरे, ॲड. आशा गोंधळे, ॲड. सुचेता कुलकर्णी, ॲड. अरुणा राशिनकर, ॲड. सुनिता गोरडे, ॲड. रिजवाना शेख, ॲड. करुणा शिंदे, ॲड. यास्मिन शेख आदी महिला वकिलांचा सन्मान करण्यात आला.

सहायक पोलिस निरीक्षक तेजश्री थोरात म्हणाल्या की, समाजात बदल घडविण्यासाठी कायदे जितके महत्त्वाचे आहेत. तितकेच सामाजिक संवेदनशीलतेचे योगदानही आवश्यक आहे. बालविवाह ही केवळ कायद्याचीच नव्हे तर, समाजाचीही गंभीर समस्या आहे. आज महिला वकील आणि पोलीस अधिकारी एकत्र येऊन बालविवाहमुक्त जिल्ह्याचा संकल्प करीत आहोत, ही बाब अत्यंत प्रेरणादायी आहे.

डॉ. वंदना फाटके पाटील-जगताप म्हणाल्या, हळदी-कुंकूचा सोहळा केवळ परंपरेपुरता मर्यादित न राहता आरोग्य जागृतीचा सोहळा साजरा होणे आवश्यक आहे. महिला वकिलांसाठी अरुणोदय हॉस्पिटलच्या माध्यमातून शिबिर घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बालविवाह मुक्तीचा निर्धार: येवले

एकमेकींशी संवाद साधण्याची संधीही मिळत नाही. अशा कार्यक्रमांमुळे महिला वकील एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करतात. न्यायिक क्षेत्रात महिला वकील प्रामाणिकपणे कार्य करत असून उपेक्षित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT