Share Trading Scam Pudhari
अहिल्यानगर

Share Trading Fraud: शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने शिक्षकाची 1.31 कोटींची फसवणूक

व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे जादा परताव्याचे आमिष; सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नगर: ऑनलाईन ‌‘शेअर ट्रेडिंग‌’मध्ये जादा परताव्याचे आमिषाला दाखवून एका शिक्षकाला 1 कोटी 31 लाख 65 हजारांना मोबाईलधारक महिलेने गंडा घातला. ही घटना 25 नोव्हेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 दरम्यान रोजी घडली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

गुरूकृपा हौसिंग सोसायटी, साताळकर हॉस्पिटलजवळ, अहिल्यानगर येथे राहणार्या 56 वर्षीय शिक्षकाने फिर्याद दिली आहे. 25 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांना व्हॉट्सॲपवर शेअर ट्रेडिंगबाबत जाहिरात प्राप्त झाली. अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत संबंधितांनी त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. या ग्रुपमधील ॲडमिन दीपा रसीमाने हिने गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला.

27 नोव्हेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026 या कालावधीत फिर्यादी यांनी स्वतःच्या खात्यातून सुमारे 77 लाख 45 हजार रूपये, मुलाच्या खात्यातून 8 लाख 90 हजार रूपये, मुलीच्या खात्यातून 1 लाख 30 हजार रूपये, पत्नीच्या खात्यातून 30 लाख रुपये तसेच बहिणीच्या खात्यातून 14 लाख रूपये अशी एकूण एक कोटी 31 लाख 65 हजार रूपयांची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये जमा केली. त्या गुंतवणुकीवर परतावा मिळण्याची वेळ आल्यानंतर आरोपी महिलेने आणखी पैसे भरण्याची मागणी केली. त्यानंतर संशय आल्याने फिर्यादीने संबंधिताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सागर ढिकले करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT