Ahilyanagar Police Recruitment Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Police Recruitment 2026: अहिल्यानगर पोलिस भरतीला प्रारंभ; पहिल्याच दिवशी 503 उमेदवार पात्र

73 रिक्त पदांसाठी प्रक्रिया सुरू; 801 पैकी 550 उपस्थित, 47 अपात्र

पुढारी वृत्तसेवा

नगर: अहिल्यानगर पोलिस दलातील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेस बुधवारी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी 801 उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी 550 जणांनी भरती प्रकियेला हजेरी लावली. 251 जणांनी पहिल्याच दिवशी दांडी मारली. 47 जण अपात्र ठरले असून, 503 उमेदवार पात्र ठरले आहेत.

अहिल्यानगर जिल्ह्यासह प्रत्येक जिल्ह्यात सध्या पोलिस भरती सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 73 रिक्त पदासांठी भरती होत आहे. पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. पोलिस शिपाई पदाच्या 73 रिक्त जागांसाठी सुमारे 4 हजार 148 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात 812 महिला उमेदवारांचे अर्ज आहेत. माजी सैनिकांचे 142 अर्ज आहेत. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर बुधवारी पहाटे भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला. सुमारे चार दिवस चालणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी पहिल्या दिशवी सुमारे 801 उमेदवारांना बोलविण्या आले होते. त्यापैकी 550 उमेदवारांनी प्रत्यक्षात हजेरी लावली. वजन, उंची, गोळा फेक, शंभर मिटर धावणे व 1600 मीटर धावणे असे भरती प्रक्रियेचे टप्पे पार करून 503 उमेदवार लेखी परीक्षेकरिता पात्र ठरले आहेत. तर, 47 उमेदवार अपात्र ठरलेी आहेत.

उमेदवारांचे वजन, उंची, गोळा फेक, शंभर मिटर धावणे या प्रकराची चाचणी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर घेण्यात आली. तर, 16 मिटर धावणे हा प्रकार केडगाव लिंक रोड येथे घेण्यात आला.

ही भारती प्रक्रिया पादर्शकपद्धतीने राबविण्यासाठी सुमारे चारशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात 45 अधिकारी व 350 अंमलदारांचा समावेश आहे. तर, 30 जिल्हा लिपिक कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे.

पोलिस दलातर्फे राहण्याची व्यवस्था

जिल्हा पोलिस दलाच्या 73 जागांसाठी रिक्त पदाची भरती प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची राहण्याची व्यवस्था मुख्यालयातील मॅरेज हॉलमध्ये करण्यात आली आहे. तिथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यांना सकाळी चहाची व्यवस्थाही करण्यात आली आहे, असे पोलिस दलाकडून सांगण्यात आले.

100 व 1600 मीटर धावणे या प्रकारांमध्ये ऑलिंपिकच्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत. त्यामुळे भरती प्रक्रिया आणखी पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. उमेदवारांच्या हालचालीवर, भरती प्रक्रियेच्या बाहेर वावरणाऱ्यांवर विशेष लक्ष आहे. तसेच, काही उमेदवार स्टेरॉईड इंजेक्शन वापरण्याचा प्रयत्न करतात. अशा उमेदवारांवर कारवाई करणार आहोत.
सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT