Ahilyanagar Illegal Liquor Transport Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Illegal Liquor Transport: नेप्ती शिवारात गावठी दारू वाहतूक उघड; ओमिनी जप्त, एकास अटक

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; 210 लिटर गावठी दारू जप्त करून मोठा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी मोहीम उघडली आहे. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक एकने यांनी नगर-कल्याण रोडवर हॉटेल अमरज्योत समोर, नेप्ती शिवार येथे सापळा रचून बेकायदेशीर गावठी दारूची वाहतूक करणारी ओमिनी पकडली. या कारवाईत पथकाने ३ लाख २२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एकास अटक केली.

राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांना माहिती मिळाली की, नगर तालुक्यातील नेप्ती शिवारातून ओमिनी सारख्या मोटारीतून गावठी दारूची वाहतूक हेात आहेत. त्यानुसार उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे, उपअधीक्षक प्रविणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक एक कारवाईसाठी रवाना झाले.

पथकाने नगर कल्याण रस्त्यावरील हॉटेल अमरज्योतसमोर सापळा रचून ओमिनी अडविली. मात्र, पथक आल्याची कुणकुण लागतच चालकाने ओमिनी पळविली. मात्र, अधिकार्‍यांनी पाठलाग करून ओमिनी पकडली. चालक संदीप ज्ञानेश्वर होले (वय ३९, रा. नेप्ती, ता. जि. अहिल्यानगर) यास जागेवर रंगेहाथ पकडले. ओमिनीची झडती घेतली असता त्यात गावठी दारूचे ३५ लिटरचे ६ प्लास्टिक कॅन मिळून आले.

या कॅनमधील २१० लिटर गावठी दारू जप्त केली. ओमिनी मोटारी व दारू असा ३ लाख २२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक सुरज कुसळे, दुय्यम निरीक्षक आनंद जावळे, सृष्टी भागवत, जवान सुरज पवार, सुनील निमसे, चतुर पाटोळे, सिद्धांत गिरीगोसावी, सुनंदा अकोलकर यांच्या पथकाने केली.

दुय्यम निरीक्षक आनंद जावळे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. जिल्ह्यातील अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्रीचे ठिकाणे तसेच अवैध ढाब्यांवर यापुढेही सातत्याने व कडक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती भरारी पथकाचे निरीक्षक सुरज कुसळे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT