नगर : जिल्ह्यातील आठ नगरपालिकांची मतमोजणी 3 डिसेंबरऐवजी आता 21 डिसेंबर रोजी होणार आहे. मतमोजणी लांबणीवर पडल्यामुळे उमेदवारांची घालमेल वाढणार आहे. मतदानयंत्र स्ट्राँगरुमध्ये कडक पहाऱ्यात ठेवण्यात आली आहेत.
जामखेड
- रात्री उशिरापर्यंत मतदान
- सरासरी 75 टक्के मतदानाचा
- पहिल्यांदाच अटीतटीची निवडणूक
शेवगाव
- सरासरी 68.9 टक्के मतदान.
- 97 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद
श्रीगोंदे
- रात्री नऊपर्यंत मतदारांच्या रांगा
- सुमारे सत्तर टक्के मतदान
- लक्ष्मी दर्शन झाल्याने गर्दी वाढल्याची चर्चा
- गोडाऊनला सशस्त्र पहारा
राहाता
- सरासरी 78 टक्के मतदान
- तीन ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड
- सुमारे 78.47 टक्के मतदानाचा अंदाज
- मतदान केंद्र शोधताना मतदारांची धावपळ
राहुरी
- सरासरी 72 टक्के मतदान
- थंडीच्या कडाक्याने मतदानाचा टक्का घरसला
- रात्री उशिरापर्यंत मतदान सुरूच
- शनि मंदिर परिसरामध्ये उमेदवारांमध्ये शाब्दिक चकमक
- चौरंगी लढतीने भरले रंग
संगमनेर
- सरासरी 72.75 टक्के मतदान
- अँग्लो उर्दू हायस्कूल मतदान केंद्र परिसरात दोन गटात हमरीतुमरी
- साडेसातपर्यंत मतदारांच्या रांगा
- माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे व आमदार अमोल खताळ या तिघांची प्रतिष्ठा पणाला
श्रीरामपूर
- 65 टक्के मतदानाचा अंदाज
- आठ ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर रांगा
- दोन/तीन ठिकाणी उमेदवार समर्थकांमध्ये बाचाबाची
- तीन ठिकाणी रोकड पकडली
शिर्डी
- एका केंद्रावर प्रदत्त मतदान