Illegal Liquor Transport Pudhari
अहिल्यानगर

Maharashtra Illegal Liquor Transport: जामखेडमध्ये अवैध दारू वाहतूक उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; अलिशान मोटारसह दारूचा साठा जप्त

पुढारी वृत्तसेवा

नगर: जामखेड शहरात अवैध देशी व विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने कारवाई करून आरोपीकडून आठ लाख 12 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक हरिष भोये, पोलिस अंमलदार श्यामसुंदर जाधव, सुनील मालणकर, प्रकाश मांडगे, मनोज साखरे, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करून अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाईसाठी रवाना केले.

14 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जामखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की, एक व्यक्ती अलिशान मोटारीतून देशी व विदेशी दारूचे बॉक्स विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे.

त्यानुसार पोलिस पथकाने तत्काळ जामखेड शहरात मारूती मंदिराजवळ खर्डा रोडवर जावून सापळा रचून थांबले. संशयित वाहन येताच पोलिसांनी ताब्यात घेतले. चालकास नाव विचारले असता शरद बाबासाहेब शिकारे (वय 37, रा. शिकारेवस्ती, बाळगव्हाण ता. जामखेड जि. अहिल्यानगर) असे असल्याचे सांगितले.

त्याच्या ताब्यातून 63 हजारांची देशी विदेशी व सात लाख 50 हजारांची अलिशान मोटारकार असा 8 लाख 13 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT