Gym Development Project Ahilyanagar Pudhari
अहिल्यानगर

Gym Development Project Ahilyanagar: नगर शहरातील युवकांसाठी दिलासादायक निर्णय; 17 ठिकाणी व्यायामशाळा व ओपन जिम उभारणार

आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश; राज्य शासनाकडून 1.17 कोटींचा निधी मंजूर

पुढारी वृत्तसेवा

नगर : युवकांना व खेळाडूंना तसेच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळून विविध खेळ प्रकारांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा व साहित्य मिळावे, या उद्देशाने आमदार संग्राम जगताप यांनी राज्य शासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यास मोठे यश आले आहे. शहरातील विविध प्रभागांमधील 17 ठिकाणी व्यायाम शाळा व ओपन जिम उभारण्यासाठी राज्य शासनाच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत तब्बल एक कोटी 17 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

नगर शहरात विविध भागांमध्ये या निधीमधून युवकांना व्यायामशाळा व विविध क्रीडा साहित्य उपलब्ध होऊन मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. क्रीडा क्षेत्राला चालना देणाऱ्या समाजकल्याण विभागामार्फत या प्रस्तावास मंजूर मिळाली असून निधी उपलब्ध झाला आहे. मंजूर झालेल्या एक कोटी 17 लाख निधीतून पुढील कामे करण्यात येणार आहेत.

येथे होणार नव्याने व्यायामशाळा

प्रभाग 4 मधील निलशंकर कॉलनी येथे बंदिस्त व्यायामशाळा, प्रभाग 1 मधील कॉटेज कॉर्नर येथे बंदिस्त व्यायामशाळा, प्रभाग 14 मधील ज्येष्ठ नागरिक हॉल आयटीआय कॉलेज येथे बंदिस्त व्यायामशाळा, प्रभाग 12 मधील माळीवाडा येथील कपिलेश्वर तालीम येथे बंदिस्त व्यायामशाळा. प्रभाग 12 जुनी वसंत टॉकीज रोड येथील हॉलमध्ये बंदिस्त व्यायामशाळा. प्रभाग 1 मधील सप्तश्रृंगी मंदिर, पंचवटी नगर येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा. प्रभाग 2 मधील जुना पिंपळगाव रोड शिवनगर येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा. प्रभाग 4 मधील प्रकाशपूर येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा, प्रभाग 5 दिनाभाऊ कुलकर्णी जॉगिंग ट्रॅक, सावेडी येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा,

प्रभाग 1 मधील नागापूर येथील आदर्श नगर, श्रीराम मंदिर येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा, प्रभाग 12 मधील सध्या कॉलनी, रेल्वे स्टेशन येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा, प्रभाग 14 मधील समता कॉलनी येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा, प्रभाग 15 मधील संभाजी कॉलनी, रेल्वे स्टेशन येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा, प्रभाग 16 केडगाव गावठाण येथे मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा, प्रभाग 17 मधील मोहिनीनगर येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा, पोलिस मुख्यालय येथील येथील मोकळ्या जागेत खुली व्यायामशाळा आदी कामांचा त्यात समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT