Gambling Raid Pudhari Photo
अहिल्यानगर

Ahilyanagar Gambling Raid: रेल्वे स्टेशन रोडवर जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 18 जण ताब्यात

लोखंडी पुलाजवळील अड्ड्यावर धाड; 4.67 लाखांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नगर: शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील लोखंडी पुलाजवळ चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी गुरुवारी (दि. 7) मध्यरात्रीच्या सुमारास छापा घातला. या छाप्यात हार-जितीचा जुगार खेळणाऱ्या तब्बल 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम लॅपटॉप, मोबाईल व जुगाराचे असा 4 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस अंमलदार रविंद्र टाकळे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना माहिती मिळाली की, शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्डा सुरू आहे. त्यांनी तत्काळ भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना जुगार अड्ड्यावर छापा घालण्याचा आदेश दिला. त्यानुसार 7 मे रोजी रात्री एपीआय मुलगीर, पोलिस अंमलदार दिलीप शिंदे, प्रमोद लहारे, नंदकुमार पठारे, रवींद्र टकले आणि कोतवाली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी स्टेशन रोड लगत असलेल्या लोखंडी पुलाच्या बाजूला मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा घातला.

त्यावेळी काही लोक जुगार खेळताना दिसून आले. पोलिस आल्याचे पाहून ते पळू लागले. पोलिसांनी मोबाईल, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा 4 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अंमलदार भानुदास सोनवणे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

ताब्यातील लोकांची नावे अशी

समीर सुनिल साळवे (वय 20), अथर्व सुभाष कांबळे (वय 18, रा. सौरभ नगर, भिंगार), प्रशांत चंद्रकांत पवार (वय 25, रा. मल्हार चौक, स्टेशन रोड), दीपक बाळू वाघमारे (वय 40, रा. रामवाडी, सर्जेपुरा), सचिन प्रभाकर परदेशी (वय 45, रा. सावेडी), सुरेश श्रीनिवास नन्नवरे (वय 43, रा. कायनेटिक चौक), मोझेस विन्सेंट सायमन (वय 31, रा. गवळीवाडा, भिंगार), मनोहर विश्वनाथ कोडम (वय 52, रा. तोफखाना, अहिल्यानगर), फुरकान शकील शेख (वय 25, रा. आशा टॉकीज जवळ),

जावेद आयुब शेख (वय 26, रा. आशा टॉकीज जवळ, अहिल्यानगर) किसन विठोबा पवार (वय 42, रा. निंबळक, ता. अहिल्यानगर), संतोष रामभाऊ राशीनकर (वय 41, रा. वडाळा महादेव, ता. श्रीरामपूर), युवराज भाऊसाहेब करंजुले (वय 46, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर), रोहित विजय उमाप (वय 25, रा. माळीवाडा, अहिल्यानगर), प्रकाश रमनलाल शहा (वय 67, रा. आनंदबाजार, अहिल्यानगर), युवराज बाळू वाघमारे (वय 25, रा. माळीवाडा) शहारुख इक्बाल पठाण (वय 30, रा. कोठला, अहिल्यानगर), अल्फाज अल्लाउद्दीन तांबोळी आदींसह 30 जणांचा पोलिसांनी पकडलेल्यामध्ये समावेश आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून त्यांना सोडून देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT