Firing Case Arrest Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Firing Case Arrest: अहिल्यानगरमध्ये राज चेंबरसमोरील गोळीबार प्रकरणात दोघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांची कारवाई; आरोपींकडून गावठी पिस्तुल जप्त

पुढारी वृत्तसेवा

नगर: अहिल्यानगर शहरात राज चेंबर कोठला येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांना यश मिळाले आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल जप्त करण्यात आला आहे. जाबीर उर्फ जबू सादीक सय्यद (रा.मुकुंदनगर), कादर उर्फ पप्पू मुस्सा शेख (रा.कोठला झोपडपट्टी, अहिल्यानगर) आणि जैद उर्फ टैप्या रशीद सय्यद (रा.आलमगीर, अहिल्यानगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी अबरार मुक्तर शेख यांनी अफजल आसीर शेख व अस्लम असीर शेख यांच्याविरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा दाखल केला होता. तो गुन्हा मागे घेत नाही, याचा मनात राग धरून आरोपी सय्यद जैद रशीद उर्फ टैप्या, जाबीर सादीक सय्यद उर्फ जबू, अफजल आसीर शेख, अस्लम असीर शेख, अल्ताफ शेख (सर्व रा. मुकुंदनगर अहिल्यानगर) यांनी संगमताने कट रचून 11 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री अबरार शेख याच्यावर राज चेंबर समोर कोठला येथे रिक्षा आडवी लावून गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. त्यात अबरार शेख गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना आरोपींच्या शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीने पथके रवाना केली होती.

शुक्रवारी रात्री आरोपी जाबीर उर्फ जबू सादीक सय्यद (रा. मुकुंदनगर) हा सारसनगर परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पोलिस पथकाने कोंबडीवाला मळा परिसरातून जाबीर सय्यद याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता 11 फेबु्रवारी रोजी साथीदार कादर शेख, जैद सय्यद (रा. आलमगीर) अशांनी मिळून मागील भांडणाच्या कारणावरून रिक्षामध्ये एकत्र येऊन जैद उर्फ टैप्य याने गावठी पिस्तुलातून अबरार शेख याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर त्याच्या साथीदार कादर उर्फ पप्पु शेख, जैद उर्फ टैप्या रशीद सय्यद यांना अहिल्यानगर शहरातून ताब्यात घेतले. आरोपी जैद उर्फ टैप्या रशीद सय्यद याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी पिस्तुल जप्त केला.

जैद उर्फ टैप्या रशिद सय्यद हा रेकार्डवरील आरोपी असून त्याच्यावर भिंगार कॅम्प, कोतवाली, विश्रामबाग पुणे येथे गंभीर स्वरूपाचे 15 गुन्हे दाखल आहेत. जाबीर सय्यद यांच्याविरोधात तोफखाना, कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ताब्यातील आरोपींना तपासकामी तोफखाना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलिस अंमलदार विजय पवार, शाहीद शेख, गणेश धोत्रे, सुनील पवार, फुरकान शेख, भिमराज खर्से, अमृत आढाव, सागर ससाणे, अर्जुन बडे व तोफखाना पोलिस ठाण्याचे जगदीश भांबळ, उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलिस अंमलदार रियाज इनामदार, सुजय हिवाळे, सुमित गवळी, कपिल गायकवाड यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT