Ahilyanagar District Bank Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीला सुरुवात; प्रारूप मतदारयादीत दिग्गजांचे ठराव

सोसायटीत १,३६०, बिगरशेतीत १,४७१ ठराव; संगमनेर-कोपरगावसह ‘गेमचेंजर’ तालुक्यांकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

नगर: जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती देणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रारूप मतदारय़ादी आज (बुधवारी) प्रसिद्ध झाली. त्यात सोसायटी मतदारसंघासोबतच बिगरशेती मतदारसंघातून साखरसम्राटांचे ठराव झाल्याचे समोर आले. आता सहकारातील दिग्गज एकमेकांच्या गळ्यात गळे घालून बँकेच्या सत्तेचा मळा कसा आणि कोणत्या आयुधांच्या माध्यमातून फुलवणार, हे समजण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. सहकाराच्या बदलत्या नियमाची धास्ती अनेक दिग्गजांनी घेतल्याचे दिसून आले. त्यामुळेच पर्याय म्हणून कुटुंबातील महिला/पुरुषाच्या नावे ठराव झाल्याचेही स्पष्ट झाले.

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण मतदारसंघातील १४ जागांसाठी तब्बल १३६० ठराव प्राप्त झाले आहेत. या ठरावांमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, डॉ. सुजय विखे पाटील, खा. नीलेश लंके यांच्याशिवाय आणखी दहा आमदारांच्या नावाचा समावेश आहे.

जिल्ह्याच्या राजकारणाची आर्थिक नाडी असलेली जिल्हा बँक आपल्या ताब्यात असावी आणि आपण त्यामध्ये संचालक असावे अशी अनेकांची इच्छा आहे. त्यासाठी सोसायटी मतदारसंघातील सेवा संस्थांतून आपल्या नावाचे ठराव अनेकांनी घेतले आहेत. जिल्हा बँकेची प्रारूप मतदारयादी आज (बुधवारी) जाहीर झाली असून, या यादीतील ठराव अर्थात मतदारांची नावे पाहता निवडणूक मोठी प्रतिष्ठेची होण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात कोणत्या तालुक्यातून कोणाला उमेदवारी मिळते आणि कोणत्या राजकीय आघाड्या आकाराला येतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

तालुकानिहाय प्रमुख ठराव... सोसायटी मतदारसंघ

  • श्रीरामपूर : इंद्रभान थोरात, माधुरी सुधीर नवले, दीपक पठारे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, करण ससाणे

  • श्रीगोंदा : आमदार संग्राम अरुणकाका जगताप, राहुल जगताप, प्रणोती जगताप, राजेंद्र नागवडे, प्रवीणकुमार नाहाटा, प्रतापसिंह पाचपुते, अर्चना दत्तात्रय पानसरे, दत्तात्रय पानसरे, बाबासाहेब भाऊ, संभाजी लांगोरे, अण्णासाहेब शेलार

  • शेवगाव : राजश्री चंद्रशेखर घुले, अरुण मुंडे

  • राहुरी : आमदार प्राजक्त तनपुरे, सत्यजित कदम, किरण कडू, स्वाती ज्ञानेश्वर कोळसे, दत्तात्रय खुळे, शारदा खुळे, हर्ष तनपुरे, ॲड. सुभाष पाटील, शशिकला सुभाष पाटील, अमोल बनगडे, सुरेश वाबळे, नामदेव ढोकणे, उज्वला राजेंद्र साबळे

  • पारनेर : खासदार निलेश लंके, आमदार काशिनाथ दाते, विश्वनाथ कोरडे, सबाजीराव गायकवाड, नंदकुमार झावरे, गीतांजली उदय शेळके

  • जामखेड : विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, अमोल राळेभात आणि सुधीर राळेभात

  • अकोले : मधुकर नवले, वैभव पिचड, अमित भांगरे, आमदार किरण लहामटे आणि कैलास वाघचौरे

  • संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात, रामहरी कातोरे, रणजीतसिंह देशमुख, अजय फटांगरे, गणपत सांगळे, शाळीग्राम होळकर, सतीश खताळ

  • राहाता : भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, एकनाथ घोगरे, भास्कर खर्डे

  • पाथर्डी : आमदार मोनिका राजळे, प्रताप ढाकणे, ऋषिकेश ढाकणे, मनोरमा दिलीप खेडकर, संजय मरकड, सतीश पालवे, अर्जुन शिरसाट

  • नेवासा : आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या पत्नी रत्नमाला लंघे, माजी मंत्री शंकरराव गडाख, सुनीता शंकरराव गडाख, भरत बेलेकर, नानासाहेब तुवर आणि रविराज तुकाराम गडाख

  • कोपरगाव : आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, बिपीनराव कोल्हे, नितीन कोल्हे, नितीन औताडे, केशवराव भवर

  • कर्जत : विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, मंजूषा गुंड, काकासाहेब तापकीर, सुनंदा अंबादास पिसाळ, तुषार अंबादास पिसाळ, विजयालक्ष्मी फाळके, सुरेश साळुंखे, बापूसाहेब काळदाते, गुलाबराव तनपुरे

जागा एक; दावेदार अनेक

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला असून, बिगरशेती मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या नावांचे ठराव झाल्याने निवडणुकीची चुरस वाढण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघातून तब्बल १ हजार ४७१ ठराव आले असून, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, प्रसाद तनपुरे, बिपीनराव कोल्हे, चंद्रशेखर घुले, शंकरराव गडाख, भानुदास मुरकुटे यांच्यासह डॉ. सुजय विखे पाटील, जयश्री थोरात, आशुतोष काळे, विवेक कोल्हे आदी प्रमुख नावांचा समावेश आहे.

जिल्हा बँकेच्या बिगरशेती मतदारसंघातून एक संचालक निवडून दिला जातो. त्यामुळे या १४७१ ठरावांमध्ये कोणाच्या नावामागे किती राजकीय ताकद आहे आणि अखेर कोणाची बँकेत एन्ट्री होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, यापैकी अनेकांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याच्या तयारीनेच आपल्या नावाचे ठराव करून घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे बिगरशेती मतदारसंघात ठरावांच्या माध्यमातूनच नेत्यांची राजकीय ताकद आजमावली जात असल्याचे चित्र आहे. आगामी काळात कोणत्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव होते आणि या मतदारसंघातून कोण जिल्हा बँकेत प्रवेश करतो, याची उत्सुकता लागली आहे.

तालुकानिहाय प्रमुख ठराव... बिगरशेती मतदारसंघ

  • अकोले : विद्यमान संचालक अमित भांगरे, भाऊ पाटील नवले, विक्रम नवले

  • जामखेड : राजेंद्र कोठारी, सुधीर राळेभात, प्रशांत सदाशिव लोखंडे

  • कर्जत : नामदेव राऊत, मीनाक्षी साळुंखे, यशांजल शेळके

  • कोपरगाव : उत्तमराव औताडे, नितीन औताडे, आशुतोष काळे, चैताली आशुतोष काळे, ओमप्रकाश कोयटे, बिपीनराव कोल्हे, विवेक कोल्हे, स्नेहलता कोल्हे

  • नगर : सुवर्णा संदीप कोतकर, माजी संचालक प्रशांत गायकवाड, शरद झोडगे, वसंत लोढा, उद्धवराव दुसुंगे

  • नेवासा : पांडुरंग अभंग, कडूभाऊ काळे, शंकरराव गडाख

  • पारनेर : सुचित झावरे

  • राहुरी : प्रसाद तनपुरे, चंद्रशेखर कदम, सुजाता अरुण तनपुरे, शिवाजी कपाळे, सुरेश वाबळे, किसन जवरे

  • राहाता : विजय कोते, कमलाकर कोते, धनंजय गाडेकर, राजेंद्र गोंदकर, शालिनीताई राधाकृष्ण विखे, डॉ. सुजय राधाकृष्ण विखे

  • शेवगाव : माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, विद्याधर काकडे

  • श्रीरामपूर : भानुदास मुरकुटे

  • संगमनेर : बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे, माधवराव कानवडे, गणपतराव सांगळे, जयश्री थोरात

  • श्रीगोंदा : राजेंद्र नागवडे, प्रतापसिंह पाचपुते, प्रतिभा पाचपुते, दत्ता पानसरे, घनश्याम शेलार

निर्णायक तालुके आणि ठराव

  • सोसायटी : श्रीगोंदा (१६८), संगमनेर (१३५), नेवासा (१३०), कोपरगाव (१०९)

  • बिगरशेती : अहिल्यानगर (२४८), कोपरगाव (२२४), संगमनेर (१९९), राहाता (११०)

  • शेतीपूरक : संगमनेर (२५८), कोपरगाव (१६८), अकोले (७९), राहाता (७३)

गेम चेंजर कोण?

संगमनेर–कोपरगाव ही जोडी तीनही मतदारसंघांत प्रभावी; तर अहिल्यानगर, श्रीगोंदा, नेवासा, राहाता आणि अकोले हे संबंधित मतदारसंघात ‘गेमचेंजर’ ठरण्याची शक्यता आहे.

संगमनेर, कोपरगाव, नगर ‘लीड’र

सोसायटी, बिगरशेती आणि शेतीपूरक या तिन्ही मतदारसंघांतील पात्र ठराव अर्थात मतदार लक्षात घेता संगमनेर (५९२), कोपरगाव (५०१), नगर (३८६) असे संख्याबळ आहे. या तीन तालुक्यांची एकत्रित मतदारसंख्या १४८९, म्हणजे ४० टक्के आहे. आरक्षित पाच जागांवरील विजयासाठी १८२४ मते आवश्यक असल्याने या तीन तालुक्यांत ८१ टक्के मते आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यांतून कोणत्या पॅनलला किती ‘लीड’ मिळते, यावर पाच जागांच्या लढतीचे गणित अवलंबून राहू शकते.

‘शेतीपूरक’मधून राजळे, पाचपुते, कर्डिले, पिचड आणि परजणे

शेतीपूरक मतदारसंघातील एका जागेसाठी ८१६ ठराव झाले आहेत. त्यामध्ये आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार अक्षय कर्डिले, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मधुकर नवले, वैभव पिचड, अमित भांगरे, चैताली काळे, बिपीनराव कोल्हे, राजेश परजणे, सुनीता गडाख, नरेंद्र घुले, क्षितिज घुले, उषाताई तनपुरे, गणपतराव सांगळे, हर्षदा काकडे, ऋषिकेश ढाकणे, चंद्रशेखर घुले, माधवराव कानवडे, अनुराधा नागवडे, राजेंद्र नागवडे, दत्ता पानसरे यांच्या नावांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT