Ahilyanagar Chain Snatcher Arrested Pudhari
अहिल्यानगर

Ahilyanagar Chain Snatcher Arrested: अहिल्यानगरमध्ये चैनस्नॅचर जेरबंद; १६ गुन्ह्यांतील सराईत आरोपीला कोथरूडमधून अटक

तोफखाना परिसरातील मंगळसूत्र हिसकावल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन गुन्ह्यांची कबुली

पुढारी वृत्तसेवा

नगर: शहरातील तोफखाना हद्दीत चैनस्नॅचिंग करणारा रेकॉर्डवरील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून १ लाख ३२ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सागर रमेश नागपुरे (वय ३३, रा. सावतानगर, भिंगार ता. जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ९ जुलै रोजी सायंकाळी आरोपीने दुचाकीवर भरधाव वेगात फिर्यादीजवळ येत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेले. याबाबत मानसी जीवन महाजन (रा. तुळजा भवानी मंदिराजवळ, पाईपलाईन रोड, सावेडी) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

या गुन्ह्याची उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलिस अंमलदार सुनील पवार, शाहीद शेख, विष्णू भागवत, फुरकान शेख, प्रकाश मांडगे, प्रशांत राठोड यांचे पथक रवाना केले.

पथकास गोपनीय माहिती मिळाली की वरील गुन्हा सागर नागपुरे याने केला असून, तो कोथरूड (पुणे) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने कोथरूड येथे सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून

६२ हजार १९० रुपये रोख व दुचाकी असा १ लाख ३२ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याने तोफखाना हद्दीत दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपी नागपुरे सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरोधात कोतवाली, तोफखाना, श्रीरामपूर, लोणी, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात १६ गुन्हे दाखल आहेत. पुढील तपासाकामी आरोपी नागपुरे याला तोफखाना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT