73 जनावरांची कत्तलीतून मुक्तता; संगमनेरात पोलिसांकडून छापेमारी  File Photo
अहिल्यानगर

Sangamner: 73 जनावरांची कत्तलीतून मुक्तता; संगमनेरात पोलिसांकडून छापेमारी

याप्रकरणी तब्बल 17 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

संगमनेर: शहर पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून, सलग तीन दिवस केलेल्या धडक कारवाईमध्ये तब्बल 73 जनावरांची कत्तलीतून सुटका केली आहे. ताब्यात घेतलेल्या जनावरांची किंमत सुमारे 32 लाख 30 हजार रुपये आहे. दरम्यान, याप्रकरणी तब्बल 17 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी, दैनिक पुढारी बोलताना दिली.

बकरी ईद सण साजरा करताना, गोवंश जनावरांची कत्तल होऊ नये, यासाठी पोलिसांनी दखल घेतली. शहरातील विविध भागांमध्ये शोध मोहिम राबविण्यात आली. रात्री 8 वाजेच्या सुमारास पोलिसांना गुप्त खबर्‍याकडून माहिती मिळाली की, जुना जोरवे रस्ता, म्हसोबा मंदिरामागील काटवनात अज्ञात इसमाने निर्दयपणे बांधलेली गाय व वासरु जप्त करण्यात आले. त्यांची किंमत 35 हजार रुपये आहे. (Latest Ahilyanagar News)

याप्रकरणी पोलिस काँस्टेबल विशाल करपे यांनी गुन्हा दाखल केला आहे. कोल्हेवाडी रस्त्यालगत मोना प्लॉटजवळील काटवनात दोन गाया व एक वासरु बांधलेले आढळले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे. त्यांची किंमत 65 हजार रुपये आहे. पोलिस काँस्टेबल संतोष भास्कर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली.

दरम्यान, मदिनानगरजवळ आर. के. प्लॉट जवळ काटवणात अज्ञात इसमाने निर्दयीपणे बांधलेली 5 वासरे जप्त करण्यात आली. त्यांची किंमत 25 हजार रुपये आहे. पोलिस काँस्टेबल आत्माराम पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. कमल पेट्रोल पंपामागे फारूक युसूफ सय्यद याने कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे दोन गाया व दोन वासरे बांधल्याचे आढळले. याप्रकरणी पोलिस काँस्टेबल अतुल उंडे यांनी फिर्याद दिली.

फारुख सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (दि.6) रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास रमाई गार्डनजवळ काटवणात कत्तलीच्या उद्देशाने बांधलेली गोवंश जातीची 3 मोठी जनावरे पोलिसांनी जप्त केली. त्यांची किंमत 2 लाख 10 हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलिस काँस्टेबल हरिश्चंद बांडे यांनी फिर्याद दिली.

बौद्ध स्मशानभूमी परिसरात कत्तलीच्या उद्देशाने बांधलेली 3 जनावरे जप्त केली. त्यांची किंमत 2 लाख 10 हजार रुपये आहे. पोलिस काँस्टेबल संतोष बाचकर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. मदिनानगर येथे इसमाने कत्तलीच्या उद्देशाने चारा- पाण्याविना निर्दयीपणे गोवंश जातीची 4 मोठी जनावरे बांधल्याचे आढळले.

त्यांची किंमत 2 लाख 80 हजार रुपये आहे. पोलिस काँस्टेबल राहुल सारबंदे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मदिनानगर म्हसोबा मंदिर परिसरात काटवणात कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या 3 गाया पोलिसांनी जप्त केल्या. त्यांची किंमत 2 लाख 10 हजार रुपये आहे. पोलिस काँस्टेबल विशाल करपे यांनी फिर्याद दिली.

अलकानगर भागात 4 जनावरे व एक वासरू कतलीच्या उद्देशाने निर्दयपणे बांधलेले आढळले. त्यांची किंमत 2 लाख 90 हजार रुपये आहे. याप्रकरणी पोलिस काँस्टेबल राहुल डोके यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी विविध 17 गुन्हे दाखल केले आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक रावसाहेब लोंखडे, पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग, रमेश पाटील व इम्रान खान, पोलिस काँस्टेबल विशाल करपे, हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार, रोहिदास शिरसाठ, अजित कुन्हे, संतोष बाचकर व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यात सहभागी झाले होते.

‘बकर ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोवंश व गोमांस विक्री विरोधात विशेष मोहिम राबविण्यात आली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये तब्बल 17 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. विविध छाप्यांमध्ये एकूण 73 गोवंश जनावरे जप्त करण्यात आली. त्यांची किंमत 32 लाख 30 हजार रुपये आहे. गोवंश जनावरांच्या देखभालीसाठी जिवदया गोशाळा (सायखिंडी, ता. संगमनेर येथे हलविण्यात आले आहे.
-रविंद्र देशमुख, पोलिस निरीक्षक, संगमनेर शहर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT