नगर: मे महिन्यात झालेल्या अवेळी वादळी पावसामुळे जिल्ह्यातील एकूण 6 हजार 521 .37 हेक्टर क्षेत्रावरील पिके आणि फळबागांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल कृषी विभागाने जाहीर केला आहे.
या नुकसानीचा आर्थिक फटका 16 हजार 177 शेतकर्यांना बसला आहे. या बाधित शेतकर्यांना शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत मिळावी यासाठी 18 कोटी 68 लाख रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, अकोले तालुक्यात सर्वाधिक 1336 हेक्टर तर सर्वात कमी नुकसान शेवगाव तालुक्यातील 0.20 हेक्टरवर झाले आहे. (Latest Ahilyanagar News)
जिल्ह्यात मे महिन्यात सर्वदूर पाऊस झाला. सरासरी 220 मि.मी. पाऊस झाला. या वादळी पावसाने सर्वच तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात जवळपास आठशे हेक्टर पिके आणि फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने शासनाला पाठविला होता.
महिनाभरात झालेल्या नुकसानीचा अंतिम अहवाल कृषी विभागाने तयार केला असून, 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान 744 गावांतील 16 हजार 177 शेतकर्यांचे पिके आणि फळबागांचे झाले आहे.
1 जानेवारी 2024 या शासन निर्णयानुसार जिरायती पिकांसाठी हेक्टरी 13 हजार 600 रुपये, बागायती पिकांसाठी 27 हजार तर फळबागांसाठी 36 हजार रुपये नुकसानभरपाईची रक्कम बाधित शेतकर्यांना अदा केली जात आहे.जिल्ह्यातील बाधित शेतकर्यांना आर्थिक मदतीसाठी शासनाकडे 18 कोटी 68 लाख 13 हजार रुपयांचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.
बाधित क्षेत्र कंसात निधी लाखांत
अहिल्यानगर : 1104.34 (322.0416),
पारनेर : 459.48 (125.44),
पाथर्डी : 106.90 (34.1613)
कर्जत : 776.96 (218.9250)
जामखेड : 276 (76.0518)
श्रीगोंदा : 890.57 (254.1753)
श्रीरामपूर : 39.24 (10.5948),
राहुरी : 513.48 (141.3864),
नेवासा : 365.59 (102.1383),
शेवगाव : 20 (5.4180),
संगमनेर : 523.66 (175.8807),
अकोले : 1336.43 (368.8281),
कोपरगाव : 34.46 (9.5022),
राहाता : 74.22 (23.5845).
पिकांचे नुकसान क्षेत्र हेक्टर
जिरायती : 0.20
बागायती : 5327.98.
फळबागा : 1193.19