उत्तर महाराष्ट्र

नाशिक मनपा : आयुक्तांच्या पाहणीनंतर दुसर्‍याच दिवशी धोबी घाटावर हातोडा

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गोदावरी नदी प्रदूषणासंदर्भात आयुक्त रमेश पवार यांनी अधिकार्‍यांसह बुधवारी (दि. 1) पाहणी केली आणि दुसर्‍याच दिवशी चोपडा लॉन्स परिसरात गोदापात्रालगत असलेल्या खासगी व्यावसायिकाच्या अनधिकृत धोबी घाटावर हातोडा टाकण्यात आला. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा धोबी घाट कुणाच्या आशीर्वादाने सुरू होता, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, हा धोबी घाट ज्या विभागाच्या अखत्यारित येत होता त्या अधिकार्‍यांचे या धोबी घाटाकडे इतक्या दिवस लक्ष का गेले नाही. यामुळे याबाबत जबाबदारी निश्चित करून खरे तर आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे. त्यामुळे आता आयुक्त काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. आयुक्त रमेश पवार यांनी अहिल्याबाई होळकर पूल ते जलालपूर मनपा हद्दीपर्यंत बुधवारी (दि. 1) नदीपात्राची पाहणी केली होती. या पाहणीत गोदावरी नदीपात्रातील चोपडा लॉन्स येथील पुलाच्या बाजूला खासगी व्यावसायिक धोबी घाट तयार करून कपडे धूत असल्याचे निदर्शनास आले होते. या धोबी घाटामुळे गोदावरी नदीचे प्रदूषण होत असल्याने दगडी पक्क्या स्वरूपात असलेला धोबी घाट त्वरित तोडून संबंधित धोबी व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश नाशिक पश्चिम विभागीय अधिकार्‍यांना दिले होते. त्यानुसार विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र व त्यांच्या पथकाने संबंधित धोबी व्यावसायिकाने गोदावरी नदीत अनधिकृतपणे बांधलेला धोबी घाट संपूर्णपणे तोडून व्यावसायिक धोब्यावर 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाईदेखील केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT