दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी नगरपंचायत निवडणूक अतिशय शांततेत व सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १२२४६ मतदारांपैकी ९७८४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या नगरपंचायतसाठी ८० टक्के मतदान झाले असून, ४३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
सकाळच्या सत्रात अवघे १३ टक्के मतदान झाले होते. दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात ५७ टक्के मतदान झाले. सर्व मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त असल्याने कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले.
एकूण १७ प्रभाग असून त्यापैकी प्रभाग क्रमांक ११ व १६ यांची निवडणूक प्रक्रिया १८ जानेवारीला होणार आहे. व प्रभाग क्रमांक १७ मधून सुजित मुरकुटे बिनविरोध निवडून आलेले आहे.
१४ प्रभागात झालेले मतदान खालीलप्रमाणे
४३ उमेदवारांपैकी १४ जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस १२, भाजपा १०, शिवसेना ८, इंदिरा काँग्रेस २, मनसे २ व अपक्ष ९ जागांवर उमेदवारी करत आहे. मतमोजणी १९ जानेवारीला होणार असल्याने तोपर्यंत सर्वच उमेदवारांची निकलाबाबतची उत्सुकता लागून राहिली आहे.
हेही वाचा :