उत्तर महाराष्ट्र

नाशिकच्या सायकलपटूंचा मुंबई ते कन्याकुमारी १७०० किमीचा सागरतट प्रवास

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील सायकलपटू दूर्वांकुर टूर्सचे संचालक मिलिंद लोहकरे आणि मयूरेश मार्केटिंगचे संदीप जाधव या सायकलपटूंनी मुंबई ते कन्याकुमारी असा १७०० किमीचा सायकल प्रवास करून निरामय आरोग्य आणि क्षमता विकसित करण्याचा संदेश दिला आहे.

५६ वर्षीय मिलिंद लोहकरे आणि त्याचे सहकारी संदीप जाधव यांनी १ फेब्रुवारी रोजी नाशिकहून सायकलवर प्रवासाला प्रारंभ केला. सागरी किनाऱ्यांवरून सफर पूर्ण करायची असल्याने मुंबईमार्गे कोकणातून प्रवासाचा मार्ग आरंभला.

हिरवा निसर्ग, रुपेरी सागरकिनारे, ताडामाडाच्या बागा हे सौंदर्य डोळ्यात साठवत सायकलपटू दक्षिणेकडील राज्यात गेले. दिवसभर प्रवास आणि रात्र जिथे जसे असेल तिथे मुक्काम असा दिनक्रम ठरवून लोहकरे, जाधवद्वयीने तब्बल १७०० किमीचा पल्ला पूर्ण केला. १५ फेब्रुवारी रोजी कन्याकुमारी येथे ते पोहोचले. पर्यावरण, आरोग्य जनजागृतीसाठी दोघांनी १७०० किलोमीटरचा सायकल प्रवास केला. आयुष्याचे गणित उलगडले. कष्ट, मेहनतीचा चढ चढल्याशिवाय सुखाचा उतार मिळत नाही. सुखाच्या उताराच्या वेळी स्वतःचाच तोल सांभाळावा लागातो. प्रवासाने क्षमता ओळखता आल्या. 'ब्रेक ईव्हन पॉइंट' पार केला की नव्याने स्वतःच्या क्षमता समजतात. सायकल प्रवासाने जीवनाचा नवा अर्थ उमगला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT