उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये 29 दिवसांत 145 जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा

अंजली राऊत

सिडको : पुढारी वृत्तसेवा
येथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, मे महिन्यातील 29 दिवसांत मोकाट कुत्र्यांनी 145 जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. महानगरपालिकेने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गोविंदनगर, सदाशिवनगर भाग तसेच कॉलनी भागात मोकाट कुत्रे कळपाने फिरतात. काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांवर हल्ला करून जखमी केले होते. – कैलास चुंभळे, सामाजिक कार्यकर्त.

सिडको परिसरातील गोविंदनगर, सदाशिवनगर, शिवाजी चौक, जुने सिडको परिसर लगतच्या खोडे मळा, इच्छामणी, वृंदावन कॉलनी, मंगलमूर्तीनगर, महाराणा प्रताप चौक, गणेश चौक, मोरवाडी, विजयनगर, पंडितनगर, उत्तमनगर, पवननगर, सावतानगर, त्रिमूर्ती चौक, पाटीलनगर, शिवशक्ती चौक, खुटवडनगर, डीजीपीनगर, माउली लॉन्स, अंबड, औद्योगिक वसाहत तसेच मळे परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. मोकाट कुत्रे रस्त्यालगत बसलेले असतात. रस्त्यावरून जाणार्‍या सायकली अथवा दुचाकीचा पाठलाग करतात. कुत्रा चावा घेईल या भीतीने सायकलस्वार अथवा दुचाकीस्वार वेगाने चालवतात.

मनपाच्या खत प्रकल्पाजवळील कुत्री अंबड भागात सोडून दिली जातात. त्यामुळे अंबड गाव व मळे परिसरात आणि औद्योगिक वसाहतीत मोकाट कुत्री मोठ्या प्रमाणात आहेत. ही कुत्री शेतकरी, कामगार व लहान मुलांना चावून जखमी करतात.– शरद दातीर, अंबड.

यात रस्त्यावर पडून किंवा अपघात होऊन जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच रस्त्यावरून चालणारे पादचारी, लहान मुले अथवा महिलांना चावा घेऊन जखमी केले आहे. मे महिन्यातील 29 दिवसांत 145 जणांना चावा घेऊन जखमी केले आहे. महानगरपालिकेने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मनपाच्या मोरवाडी रुग्णालयात दररोज किमान 5 ते 10 जण कुत्रा चावल्यानंतर डोस घेण्यासाठी येतात. डोस घेणार्‍यांची संख्या एखाद्या दिवशी कमी असते, तर एखाद्या दिवशी जास्त असते. इंजेक्शन साठा मुबलक आहे. -डॉ. विनोद पावस्कर, वैद्यकीय अधीक्षक, सिडको रुग्णालय.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT