मुंबई

दोन महिन्यांत डाळी 40 टक्क्यांनी कडाडल्या

Shambhuraj Pachindre

नवी मुंबई : राजेंद्र पाटील मुंबई एपीएमसीतील घाऊक दाणाबाजारात डाळींची आवक घटल्यामुळे मे आणि जून या दोनच महिन्यांत किरकोळ बाजारात डाळींचे दर चाळीस टक्के वाढले असून, सर्वच डाळींनी शंभरी पार केली आहे.

किरकोळ बाजारात डाळींचे दर किलोला 90 ते 120 रुपयांपर्यंत पोहचले असून, घाऊकपेक्षा किरकोळ बाजारात किलोमागे 8 ते 58 रुपये सर्वसामान्यांना एक किलो डाळीसाठी जादा मोजावे लागतात. रोजच्या जेवणात वरणासाठी लागणारी तुर डाळ 120 रुपये किलोच्या खाली जाण्याचे नाव घेत नाही. घाऊक बाजारात डाळींमध्ये जूनच्या दुसर्‍या आठवड्यात 4 ते 5 रुपयांची किलोमागे वाढ झाली. ही दरवाढ किरकोळ बाजारात किमान 8 ते 15 रुपये होणे अपेक्षित असल्याचे घाऊक व्यापारी सांगतात.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेलसह रायगड जिल्ह्यांत रोज किमान 90 ते 110 गाडी डाळींचा पुरवठा एपीएमसी घाऊक बाजारातुन होते. एपीएमसीतील घाऊक दाणा बाजारातमध्ये डाळींची आवक काही प्रमाणात घट झाली आहे. याचा परिणाम दरवाढीत झाला.

कडधान्ये दुप्पट महागली
दुसरीकडे घाऊक बाजारात केवळ तीन रुपयांची वाढ झाली असताना किरकोळ बाजारात मात्र चणा, मसुर, उडदी, मटकी, वाल यांचे दर घाऊकपेक्षा किरकोळ बाजारात थेट दुप्पटीने वाढले आहेत.

25 मे    25 जून 2022
डाळी आवक  दर  आवक दर
मुग 1278 9500 99 9000
मुगडाळ 3399 10000 798 10200
तुरडाळ 7296 9000 829 9500
उडीत – 5700 – 6200
मटकी 102 7500 02 7750
वाल 81 11200 09 12500
हरभरा 570 5500 974 5200
मसुर 231 7800 96 7800
मठ – 10,000 292 10,000

हेही वाचा

SCROLL FOR NEXT