मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : ग. गो. जाधव पुरस्कार : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे दिल्या जाणार्या 2019 मधील पत्रकारिता पुरस्कारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घोषणा केली.
कोल्हापूर विभागासाठी दिला जाणारा ग. गो. जाधव पुरस्कार दै. 'पुढारी'चे पत्रकार एकनाथ नाईक यांना जाहीर करण्यात आला. 51 हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
याशिवाय विविध पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा ठाकरे यांनी केली. राज्यस्तरावरील स्वच्छता महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार कराड येथील दै. 'पुढारी'च्या उपसंपादक प्रतिभा राजे यांना जाहीर झाला. पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते लवकरच मुंबईत होणार आहे.