यशश्री शिंदे हत्या प्रकरण.  file photo
मुंबई

Yashshree Shinde Murder Case | 'यशश्री'च्या वडिलांचा बदला घेण्यासाठी दाऊदने 'ती'ला संपवले

पुढारी वृत्तसेवा

उरण | Yashshree Shinde Murder Case : उरणची युवती यशश्री शिंदे (Yashshree Shinde Murder Case) हिच्या निघृण हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपी दाऊद शेख याच्या जबाबातून गेल्या दोन दिवसात निरनिराळे खुलासे बाहेर येऊ लागले आहेत. नव्या माहितीनुसार, यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर दोन टॅटू आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हे टॅटू दाऊद शेख याच्या नावाचे होते. मात्र, हा टॅटू यशश्रीच्या संमतीने काढण्यात आला की, यासाठी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली, याबाबत तपास करण्यात येत आहे.

यशश्रीच्या वडिलांनी २०१९ मध्ये आरोपी दाऊदविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो सुमारे दीड महिना तुरुंगात होता. त्यानंतर त्याचा अपघात झाला होता. सुमारे दीड महिना तो अंथरुणाला खिळून होता. प्रकृती सुधारल्यानंतर त्याने पीडितेशी पुन्हा संपर्क साधला आणि संभाषण सुरू केले. यशश्रीच्या वडिलांचा बदला घेण्यासाठी त्याने हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT