Construction Worker Death File Photo
मुंबई

Construction Worker Death: मालाडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 20 व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत साइट सुपरवायझर, सेफ्टी सुपरवायझर आणि संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

मालाड: मालाड पश्चिमेतील एव्हरशाइन नगर परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 20 व्या मजल्यावरून पडून एका बुधवारी सकाळी कामगाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत साइट सुपरवायझर, सेफ्टी सुपरवायझर आणि संबंधित कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वेदांग विवेदा या विकासकाच्या इमारतीचे काम सुरू आहे. बुधवारी सकाळी काही कामगार 20 व्या मजल्यावर काम करीत होते. यावेळी यातील एक कामगार खाली पडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

मालाडमध्ये मागील वर्षेभरात बांधकाम साईटवर अशा अनेक घटना घडल्या आहेत. यात अनेक मजुरांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मीठ चौकी लिंक रोड येथे यापूर्वी दोन घटनेत दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. वारंवार आशा घटना घडत असल्याने मजुरांच्या सुरक्षा आणि कारवाईबाबत प्रशासन गंभीर दिसत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT