‘विलिंग्डन व्ह्यू’च्या भवितव्याचा चेंडू आता पालिकेच्या कोर्टात (File Photo)
मुंबई

Willingdon View case : ‘विलिंग्डन व्ह्यू’च्या भवितव्याचा चेंडू आता पालिकेच्या कोर्टात

खंडपिठाने तपशील तपासून इमारत नियमित करण्याचा निर्णय घ्या, असे आदेश महापालिकेला दिले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः ताडदेव येथील विलिंग्डन व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील रहिवाशांचे भवितव्य महापालिका ठरविणार आहे. 18 मजल्यांवरील रहिवाशांनी घरे रिकामी केली असून इमारतीला अग्निसुरक्षा प्रमाणपत्रही देण्यात आले आहे. या प्रकरणी न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने चेंडू पालिकेच्या कोर्टात टोलावला आहे. खंडपिठाने तपशील तपासून इमारत नियमित करण्याचा निर्णय घ्या, असे आदेश महापालिकेला दिले.

ताडदेव येथील ‘विलिंग्डन व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी’ मधील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी संस्थेचे सदस्य सुनील झवेरी यांनी निवासी दाखला आणि अनिवार्य अग्निसुरक्षा नियमांचे पालन केल्याविना उभ्या राहिलेल्या या इमारतीच्या 17 ते 34 मजल्यांना निवासी दाखलाच मिळालेला नाही. याकडे न्यायालयाचे लक्ष वेधत याचिका दाखल केली.

या याचिकेची गंभीर दाखल घेत खंडपीठाने 34 मजली इमारतीला फक्त 16 मजल्यापर्यंत ओसी मिळाली असून उर्वरित 17 ते 34 मजले ओसी व्यतिरिक्त इमारतीला फायर एनओसी नसल्याचे उघडकीस आल्याने खंडपिठाने बेकायदेशीर मजले खाली करुन देण्याचे आदेश रहिवाशांना दिले.

मगच इमारत नियमित करा

रहिवाशांनी घरे रिकामी केली. परंतु, कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे धाव घेऊन याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला सोसायटीच्या अर्जावर निर्णय घेण्याचे आदेश दिले. याची दखल न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने घेत बिल्डिंगची सर्व तपशील तपासल्यानंतरच इमारत नियमित करण्याचा निर्णय घ्या, असे आदेश महापालिकेला दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT