Sachin Vaze Bail Pudhari
मुंबई

Sachin Vaze Bail News: सचिन वाझेला जामीन मिळणार की नाही? उच्च न्यायालयाचा निकाल राखून

अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील जामिनाला एनआयएचे आव्हान; उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ स्फोटके भरलेली गाडी ठेवल्याच्या आणि व्यापारी मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या जामिनाविरोधात दाखल केलेल्या अपिलावर शुक्रवारी सुनावणी पूर्ण झाली.

दरम्यान न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांना न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवत खंडपीठाने वाझेच्या जामिनावरील स्थगिती तूर्तास कायम ठेवली.

मुंबई सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश चकोर एस. बाविस्कर यांनी वाझेला मंजूर केलेल्या जामिनाविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए ) उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. दरम्यान, एनआयएने सचिन वाझे याच्या जामिनाला जोरदार विरोध केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT