Western Railway Local Train Update Pudhari
मुंबई

Western Railway Local Train Update: फटाक्यांमुळे मुंबईकरांचे हाल! पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल ३० मिनिटे उशिराने, काय घडलं?

Western Railway Local Train Update: लक्ष्मीपूजनाच्या रात्री फोडलेल्या फटाक्यांमुळे विरार-नालासोपारा दरम्यान रेल्वेची भूमिगत केबल जळाल्याचा संशय आहे.

Rahul Shelke

Western Railway Local Train Update: लक्ष्मीपूजनाच्या रात्री फोडलेल्या फटाक्यांचा फटका आज सकाळी मुंबईकरांच्या रेल्वे प्रवासाला बसला आहे. विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकांदरम्यान भूमिगत केबल जळाल्याने पश्चिम रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. परिणामी, सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकल वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाके फोडताना उडालेल्या ठिणग्यांमुळे रेल्वेची भूमिगत केबल जळाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे सिग्नल यंत्रणेवर परिणाम झाला आणि लोकल गाड्यांच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाले.

या तांत्रिक बिघाडाचा सर्वाधिक परिणाम विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांवर झाला आहे. काही लोकल गाड्या सुमारे १५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना गाड्यांची वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दीही वाढली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. जळालेली केबल आणि सिग्नल यंत्रणेतील बिघाड दूर करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. लवकरात लवकर लोकल वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहेत.

फटाक्यांच्या आतषबाजीचा आनंद संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचा फटका मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाला बसला आहे. ऐन कामाच्या वेळेत लोकल उशिराने धावत असल्याने पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT