विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवेतमध्ये अडकला, अभिनेत्रीची मदतीसाठी सरकारकडे विनंती, अश्रू अनावर file photo
मुंबई

विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवेतमध्ये अडकला, अभिनेत्रीची मदतीसाठी सरकारकडे विनंती, अश्रू अनावर

फेसबुकवर त्‍यांनी आपला व्हिडिओ शेअर केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

vishakha subhedar son stuck in kuwait marathi actress requests pm modi cm devendra fadnavis us israel iran war

पुढारी ऑनलाईन :

अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवेतमध्ये अडकला आहे. मुलाला भारतात परत आणण्यासाठी विशाखा सुभेदार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. फेसबुकवर त्‍यांनी आपला व्हिडिओ शेअर केला आहे.

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे मध्य पूर्वेत सध्या मोठ्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रासह देशातील अनेक नागरिक अडकले आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्या कुटुंबियांकडून सोशल मीडियावर भावना व्यक्त करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या देशात परत येण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे मदतीची याचना करत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा गेल्या चार दिवसांपासून कुवैतमध्ये अडकला आहे. मुलाला भारतात परत आणण्यासाठी विशाखा सुभेदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.

विशाखा सुभेदार यांनी फेसबुकवरील व्हिडिओत म्हटलंय की, नमस्कार मी विशाखा सुभेदार माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना विनंती आहे माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता पण कुवेत मध्ये त्याच लेओ असल्यामुळे त्याच फ्लाईट तिथे उतरवण्यात आलं पण गेले चार दिवस एअर स्पेस नसल्यामुळे सगळ्या देशाला माहिती आहे. विमान रद्द केली आणि माझा मुलगा गेली चार दिवस कुवेतमध्ये अडकला आहे. आणि आता तिथली परिस्थिती गंभीर होत चालली आपण बातम्यांमध्ये पाहतोय तो स्वतः तिथे अनुभवतोय. अनेक ड्रोन हल्ले तिथे होत आहेत. आता त्याला एका हॉटेलमध्ये एअरलाईन्स सर्विसेसने त्याची व्यवस्था केलेली आहे. इंडियन एम्बेसीनी कुवेत मध्ये असलेले त्यांनी तिथे व्यवस्था केलेली आहे. परंतु तो आता त्यांना भारतात परत आणण्याची व्यवस्था करावी जसं दुबईच्या लोकांना परत आणलं गेलं आणलं गेलं तसच कुवेत मध्ये सुद्धा आपले भारतीय अडकले त्यांना परत आणण्याची व्यवस्था करावी अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. अनेक भारतीय अनेक पोरांच्या आया अनेक कुटुंब त्यांची इथे आपल्या मायशी वाट बघत आहेत. लवकरात लवकर त्यांचा सुद्धा व्यवस्था करावी आमच्या मुलांची काळजी घ्यावी एवढीच विनंती सरकारला आणि आपल्या भारताच्या पंतप्रधानाला यांना मी करत आहे कृपयात लवकरात लवकर मार्ग काढावा.

दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात इरणचे सर्वोच्च नेते खामेरी ठार झाले आहेत. त्‍यामुळे इराणने ड्रोनच्या मदतीने आखातातील अनेक देशांवर तसेच अमेरिकेच्या तळांवर हल्ले सुरू केले आहेत. त्‍यामुळे येथील परिस्थिती चिघळत चालली आहे. या देशांमध्ये सध्या हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अनेक फ्लाईट्स रद्द करण्यात आली आहेत. त्‍यामुळे अनेक देशातील नागरिक आहे त्‍याच ठिकाणी अडकून पडले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT