AMPC Market Pudhari
मुंबई

Vegetable Price Hike: भाजीपाल्याचे दर दीडशेपार; इंधन दरवाढीचा परिणाम

25 ते 30 टक्के घाऊक दरवाढ

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: उन्हाच्या झळांमुळे उत्पादनावर झालेला परिणाम त्यात इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च यामुळेे भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. एपीएमसीच्या घाऊक बाजारात मंगळवारी 25 ते 30 टक्केपर्यंत दरवाढ झाली. परिणामी शेवगा 150, फरसबी 150, कारली 130, दोडके 120 इतर सर्व भाजीपाल्यांचे दर 140 ते 160 रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत.

एपीएमसीच्या भाजीपाला व फळ बाजारात नगर, नाशिक, पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि फळांची आवक होते. काही भाज्यांची परराज्यातूनही आवक होत आहे.

मात्र, उत्पादनात घट आणि इंधन दरवाढ यामुळे टोमॅटो, शेवगा, पालक, मेथी, वांगी, दोडका, शेपू, कांदापात, घेवडा, गवार, फ्लॉवर, फरसबी, भेंडी, भोपळा, चवळी, शेंगा, कारली, कच्ची केळी, फणस, रताळी आणि कोथिंबीरच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT