Biometric UPI payments India Pudhari Photo
मुंबई

UPI biometric password : यूपीआय पेमेंटला बायोमेट्रिक पासवर्ड

लहान व्यवहारांसाठी चेहरा, बोटांच्या ठशांचाही पर्याय

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) द्वारे लहान मूल्यांचे व्यवहार करताना आता पिन क्रमांक टाकण्याची गरज नाही. वापरकर्त्यांचा चेहरा अथवा बोटांच्या ठशांच्या आधारे देखील व्यवहार पूर्ण होतील.

फोन पे या फिनटेक कंपनीने आपल्या नवीन पद्धतीची गुरुवारी घोषणा केली. त्यामुळे पाच हजार रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी आता पिन क्रमांक टाकण्याची आवश्यकता नाही. मात्र, त्याहून अधिक किमतीचे व्यवहार करण्यासाठी पूर्वीप्रमाणेच पिन क्रमांक टाकावा लागेल. एखाद्या मित्राला अथवा कुटुंबातील सदस्यांना पैसे पाठविण्यासाठी, क्यूआर कोड स्कॅन करून खरेदीसाठी, ऑनलाइन व्यवहारांसाठी अथवा बँक खात्यातील शिल्लक रक्कम पाहण्यासाठी देखील बोटाचे ठसे अथवा फेसरीडिंग सुविधेचा वापर करता येणार आहे.

अनेकदा गर्दीच्या ठिकाणी पिन क्रमांक टाकणे गैरसोयीचे होते. आपल्या पिन क्रमांकाची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. अशावेळी बोटाच्या ठशांचा वापर करणे सोयीचे होणार आहे. ग््रााहकांना ऑनलाइन व्यवहार करणे सोयीचे जावे आणि त्यांचा गोपनीय क्रमांक सुरक्षित राहावा, यासाठी ही सुविधा देऊ करण्यात आल्याची माहिती फोन पेच्या वतीने देण्यात आली. जर, बोटांचे ठसे कोणत्याही कारणामुळे स्वीकारले जात नसतील, प्रणालीमध्ये काही अडथळे असतील तर लगेच ग््रााहक पिन क्रमांकाच्या पर्यायाचा वापर करू शकणार आहेत.

अशी सुरू करा सुविधा

बायोमेट्रिक पद्धतीने फोन पे ॲपवर गेल्यानंतर प्रोफाइलमध्ये गेल्यावर ‌’मॅनेज पेमेंट‌’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर ‌’बायमेट्रिक पे‌’साठी दोन पर्याय येतात. त्यात चेहरा आणि बोटांच्या ठशांचा पर्याय आहे. दोन्ही पर्यायांवर गेल्यानंतर वापरकर्त्याच्या चेहऱ्याचे आणि बोटाच्या ठशांचे स्कॅन झाल्यानंतर ही सेवा सुरू होते. वापरकर्त्यांनी फोन पे ॲप अपडेट असल्याची खात्री करावी. त्यानंतरच नवीन पर्याय संबंधितांना दिसतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT