धारावी अदानींच्या घशात जाऊ देणार नाही, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
धारावी अदानींच्या घशात जाऊ देणार नाही, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. Pudhari News Network
मुंबई

Uddhav Thackeray | धारावी अदानींच्या घशात जाऊ देणार नाही : उद्धव ठाकरे

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : धारावी पुनर्विकास प्रकल्प राबविण्यास अदानी यांना जमत नसेल, तर त्यांनी तो सोडून द्यावा. त्यांना काम करण्यास झेपत नसेल. तर ग्लोबल टेंडर काढून सक्षम व्यक्तीला टेंडर द्यावे, अशी मागणी करून धारावी अदानींच्या घशात जाऊ देणार नाही, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आज (दि.२०) मातोश्री येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

धारावीकरांना हाकलण्याचा प्रयत्न

ते पुढे म्हणाले की, धारावीकरांना हक्काचे घर मिळाले पाहिजे, त्यांना ५०० स्क्वेअर फुटाचे घर मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पातर्गंत धारावीकरांना पात्र अपात्रतेत अडकवून त्यांना हाकलण्याचा प्रयत्न आहे. मुंबईला लुटून भिकेला लावण्याचा डाव सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. परंतु, आम्ही एकाही धारावीकराला येथून जाऊ देणार नाही. आम्ही त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार आहे. मुंबईचे नाव बदलून अदानीसिटी होऊ देणार नाही, अदानींचे भले करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला.

सरकारकडून योजनांचा पाऊस

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सरकारकडून योजनांचा पाऊस पाडण्याचे उद्योग सुरू आहेत. लाडक्या मित्रासाठी झोपडीपट्टी दान करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. टेंडरमध्ये नसलेल्या गोष्टी देण्याचे आमिष दाखवले जात आहे. लाडका सुटबूट योजना आणली का ? असा सवाल करून जनता असल्या भूलथापांना बळी पडणार नाही.

SCROLL FOR NEXT