Maharashtra Political News Pudhari
मुंबई

Political News: आमदारांना संबोधित करायला उद्धव ठाकरे मैदानात; एकेका आमदाराची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांवर

लवकरच आम्ही थेट राजभवनात घेऊन जावू अशी शिंदे गटातील एका ज्येष्ठ नेत्यांची स्पष्टोक्ती उबाठाने गंभीरपणे घेतली आहे.

पुढारी वृत्तसेवा

मृणालिनी नानिवडेकर

मुंबई: सहा खासदारांच्या पलायनानंतर आता शिवसेना शिंदे गटाने आमदारांतही ऑपेरेशन टायगर राबवण्यात येणार या शिंदे गटाच्या ईशाऱ्याकडे धमकी म्हणून पाहिले जात असून उद्या ता २२ रोजी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे स्वतः सर्व सदस्यांना संबोधित करणार आहेत.महाराष्ट्रातील १४ आमदार फुटण्याच्या परिस्थितीत आहेत.

त्यांना लवकरच आम्ही थेट राजभवनात घेऊन जावू अशी शिंदे गटातील एका ज्येष्ठ नेत्यांची स्पष्टोक्ती उबाठाने गंभीरपणे घेतली आहे. मुंबइतुन निवडून आलेले दहा आमदार कुठेही विशेषतः शिंदे यांच्या पक्षाकडे जाणे कठीण असल्याचे मानले जाते.

तरीही कोणत्याही फाजील विश्वासात न रहाता एकेका आमदाराशी सपंर्क ठेवा असे सांगण्यात आले असून एक महत्वाचा नेता ही जबाबदारी पार पा डेल.या संबंधीचा छोटासाही तपशील मातोश्रीवर कळवावा असे सांगण्यात आले आहे.

मुंबई बाहेरच्या आमदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी शिंदे गटाने सध्या उबाठात असलेल्या दोन आमदारांवर सोपवली आहे असे म्हणतात. हे दोन आमदार आता नजरेत आहेत. ते काय करताहेत यावर बारीक लक्ष आहे.

ग्रामीण भागातील खासदार नवे असल्याने ते सध्या कोणताही धाडसी निर्णय घेणार नाहीत असे मानले जाते. मात्र ते निघून गेलेल्या खासदाराच्या मतदारसंघातले आहेत काय याकडेही लक्ष दिले जाणार आहे. निधी मिळत नाही हे कारण देत जर पक्ष बदलले जात असतील तर काय असा प्रश्न एका उबाठा नेत्याने केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT