Udhhav Thackeray Chandrakant Patil Meet
उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील यांची भेट Twitter
मुंबई

'असेच प्रेम असू दे..' उद्धव ठाकरेंची चंद्रकांत पाटील यांना मिश्किल कोपरखळी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानभवनातील पक्ष कार्यालयात भेट घेऊन पुष्पगुच्छ दिला. तेव्हा ठाकरे यांनी हसत हसतच, 'असेच प्रेम असू दे,' अशी मिश्किल कोपरखळी मारली.

चंद्रकांत पाटील यांनी दिली कॅडबरी आणि पेढे

विधानभवनात चंद्रकांत पाटील यांनी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पुष्पगुच्छ आणि कॅडबरी दिली. तेव्हा चंद्रकांत दादांना, पेढे द्या, असे दानवे म्हणाले. तेव्हा बाजूला अनिल परब उभे होते. पाटील यांनी, परब यांचे पदवीधर विधान परिषदच्या निवडणुकीतील विजयाबद्दल ॲडव्हान्समध्ये अभिनंदन केले. यावरून ठाकरे यांनी, असेच प्रेम असू दे, असा मिश्किल टोला लगावला.

SCROLL FOR NEXT