Uddhav Thackeray On Shelar:
शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि. ४ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत भाजप नेते आशिष शेलार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. भाजप नेते आशिष शेलार यांनी आम्ही मतदार याद्यांच्या घोळाबाबत आम्ही देखील तक्रार केली आहे आम्ही देखील आवाज उठवत आहोत असा दावा केला होता. त्यावर आता शिवसेना उबाठा गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. जसा आम्ही मोर्चा काढला तसा त्यांचा मोर्चा कुठं दिसला नाही. ते कधी निवडणूक आयुक्तांना भेटलेत असंही आम्ही बघीतलेलं नाही. आमची लोकं आता ज्ञानेश कुमार यांना देखील भेटणार आहेत.
उद्धव ठाकरे यांनी आम्ही बोगस मतदारांच्या प्रश्नाबाबत न्यायालयाचा दरवाजा देखील ठोठावण्याचा केविलवाना प्रयत्न करणार आहोत. न्याय मिळाला तर मिळाला असं म्हणत आपली हतबलता देखील बोलून दाखवली.
यातबरोबर उद्धव ठाकरे यांनी आशिष शेलारांनी मतदार याद्या अशुद्ध आहेत हे मान्य केलं. मतदार यांद्यामंध्ये घोळ आणि बोगस मतदार आहेत हे मान्य केलं. यावर देखील टीका करत जर तसं असेल तर तुम्ही आमच्यासोबत या सर्व इतर पक्ष याबाबत आवाज उठवतात एकत्र येतात. एकच व्यक्ती येत नाही याचा अर्थ फायदा तुम्ही घेतला असा लावला त्यात गैर काय? असा सवाल केला.
ठाकरेंनी जो मत चोरीचा मुद्दा उचलला तो आता पुराव्यानिशी सर्वांसमोर आणला. आता मतदार जागृत झाली आहे. आता झोपून चालणार नाही. आपल्याला सरकार निवडण्याचा अधिकार आहे. सरकार आता मतदारच निवडायला लागलं आहे हे घातक आहे असं देखील सांगितलं.
या प्रश्नावर कोर्टात जाण्याबाबत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे यांनी आशिष शेलार यांनी पुराव्यानिशी सगळं समोर आणून मुख्यमंत्र्यांची वाजवली आहेच असं म्हणत टोमणा देखील हाणला. त्यांनी जर त्यांना हे पटलं असेल तर भाजपनं देखील आमच्यासोबत कोर्टात यावं हे माझं त्यांना जाहीर आमंत्रण आहे.
बोगस मतदारांनी मतदानाला येण्याचं धाडस करूच नये कारण आम्ही आता नाव अन् पत्त्यानिशी चेकिंग करतोय. आता नागरिकांनी देखील तुमच्या यादीत दुसरं कोण घुसलं आहे का हे पाहिलं पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणाले.