मुंबई : बेकायदेशीररित्या व्यवसाय करुन निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या उबर कंपनीला परिवहन विभागाचे अभय आहे का ?, असा प्रश्न गिग कामगार करीत आहे. नुकतीच मुंबईत या कंपनीच्या ई-बाईक टॅक्सी सेवेचे उद्घाटन झाले. याचा भारतीय गिग कामगार मंच निषेध करीत आहे, अशी माहिती मंच अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली.
मुंबईमध्ये ई-बाईक टॅक्सीच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर, धोकादायक व नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रवासी वाहतुकीचा भारतीय गिग कामगार मंच ही संघटना निषेध करीत आहे. विशेष म्हणजे; ज्या बाईक टॅक्सी कंपन्यांविरोधात सुमारे 36 एफआयआर दाखल आहेत, असा आरोपही डॉ. क्षीरसागर यांनी केला.