मुंबईः जनतेने उबाठाला केव्हांच टाटा बायबाय केले आहे. इतर पक्षातील नेत्यांना शिवसेनेत यायचे आहे. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्यांचा विरोध केला त्या काँग्रेसच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली बसला. सत्तेसाठी लाचार कोण झाले हे जनतेला माहिती आहे. बाळासाहेब असते तर सत्तेसाठी लाचारांना मिरचीची धूर दिला असता. बाळासाहेबांचे विचार सोडल्यानेच त्यांची ही परिस्थिती झाली आहे. निवडणूका आल्यावर यांना मराठी माणूस आठवेल, मराठी माणसांच्या नावाने गळा आवळतील. पण मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवतील. अशl शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
शिवसेनेचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त मेळावा वरळी येथे पार पडला यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्यावर कडाडून टीका केली. पुढे ते म्हणाले की हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचारांचा असलेल्यांचा आहे. ८० टक्के समाजकारण म्हणजे, शिवसेनेचे धनुष्यबाण आमच्याकडे, जनतेचा आशिर्वाद आमच्याकडे, शिवसेनेला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. २०२४ मध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वात जास्त होता. असेही त्यांनी सांगितले
पुढे त्यांनी उबाठावर टीका करताना म्हटले की पाकिस्तानचे झेंडे का मिरवता, बॉम्बस्फोटातील आरोपी तुमच्या रॅलीत का मिरवतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या बाजूला बसता. गरज असेल तेव्हा हिंदुत्वाचा आधार घ्यायचा व इतर वेळी सोडून द्यायचे, या धरसोड वृत्तीमुळे तुम्हाला गेल्या विधानसभेत जनतेने जागा दाखवली, राम भक्तांना हरामखोर म्हणनारे कोण, हनुमान चालिसा म्हणनाऱ्यांना जेलमध्ये कोणी टाकले, यावेळी तुमचे हिंदूत्व कुठे गेले होते. असा सवाल शिंदे यांनी केला.
पुढे त्यांनी उद्धव यांच्यावर टीक करताना म्हटले की कोणीतरी मला सांगितले की उद्धव ठाकरे म्हणाले की कम ऑन किल मी असे म्हटले. मला वाटते इंग्रजी चित्रपट पाहून आले असावेत. तर ॲम्ब्युलंस घेऊन मारायला या म्हणतात यावर शिंदे म्हणाले की मेले आहेत त्यांना काय मारायचे. पुढे ते म्हणाले की वाघाचे कातड पांघरुण कोणी लांडगा वाघ होत नाही, शेरचा कलेजा व मनगटात ताकद लागते, नुसत्या तोंडाच्या वाफा घालवू नका असा सल्लाही त्यांनी ठाकरे यांना दिला.
तुम गोली चलावोगे तो हम तोफ गोला चलाएंगे, पाकिस्तानला घरात घुसून मारु असे म्हणन्याचे धाडस हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच करु शकतात. यापूर्वीच्या कोणत्या पंतप्रधानाना हे जमले नाही ते मोदींनी करुन दाखवले. ऑपरेशन सिंदुरबद्दल भारतातील १४० कोटी जनतेला मोदी यांच्यावर विश्वास आहे. आणि काँग्रेसच्या राहूल गांधी आणि त्यांच्या चेल्यांना मोदींवर विश्वास नाही, आपली किती विमाने पडली, आपले मिसाईल किती पडली हा हिशोब ते मागतात. त्यामुळे आपल्या लष्करावर अविश्वास दाखताय हा देशद्रोहच आहे. तुम्ही भारताचे नागरिक आहात की देशद्रोही आहात हेच यावरुन सिद्ध होते. पुढे ते म्हणाले की जर बाळासाहेब आज असते तर तुमचे कोर्ट मार्शलच केले असते.
ऑपरेशन सिंदूर नंतर आपल्या देशाचे खासदार ३२ देशांमध्ये गेले भारताची भूमिका जगभरात मांडली, पाकिस्तानला कस पाणी पाजलं हे सर्वांना सांगितले. पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला. या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्रीकांत शिंदे यांनी केले. त्याचा एक पक्षप्रमुख म्हणून व एक बाप म्हणूनही मला अभिमान आहे. शिवसेनेच दोन खासदार डॉ. मिलींद देवरा व डॉ. श्रिकांत शिंदे हे यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. ही मला अभिमानाची बाब आहे. पुढे ते म्हणाले मोदीं यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव ‘भाऊ’ असे ठेवले आहे. त्यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले याबद्दल त्यांचे कौतुक केले.
पुढे त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना म्हटले की कोणी कितीही अफवा पसरवू दे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. या लाडक्या बहीणींमुळेच मी आज इथे आहे. त्यामुळे ही योजना बंद करण्याचा कसलाही विचार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.