Crime News  pudhari
मुंबई

Drug Smuggling Case : तीन कोटीच्या 702 किलो गांजाच्या साठ्यासह दोघांना अटक

गोंदिया येथे एनसीबीच्या मुंबई युनिटची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सुमारे तीन कोटीच्या 702 किलो गांजासह दोघांना मुंबई युनिटच्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गोंदिया येथून अटक केली. प्रकाश एम. डी आणि पद्मलाल एन. एम अशी या दोघांची नावे असून ते दोघेही गांजा तस्करीच्या आंतरराज्य टोळीचे सदस्य आहे. जप्त केलेला गांजा ओरिसा येथून महाराष्ट्रातील विविध शहरात वितरीत होणार असल्याचे तपासात उघडकीस आले. दोन्ही आरोपीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत ते दोघेही एनसीबी कोठडीत आहेत.

ओरिसा येथून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने संबंधित गांजा तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना या पथकाने गोंदिया येथे कारवाईत करुन एका ट्रकला ताब्यात घेतले होते. या ट्रकची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकाऱ्यांना डिटर्जंट, टूथपेस्ट आणि हेअर डायसारख्या किराणा माल सापडले.

या सामानाच्या आड गांजाची तस्करी केली जात होती. याच ट्रकमधून या अधिकाऱ्यांनी शंभर पाकिट जप्त केले. या पाकिटातून 702 किलो गांजाचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे तीन कोटी रुपये इतकी आहे. तपासात हा गांजा ओरिसा येथून महाराष्ट्रात आणि नंतर नागपूर, पुणे, मुंबई, गोंदिया येथे वितरीत होणार होता. गांजा तस्करी करणारी ही आंतरराज्य टोळी असल्याचे उघडकीस आले.

किरकोळ विक्रेत्यांच्या मदतीने या गांजाची थेट ग्राहकांना विक्री केली जात होती. याबाबतची माहिती प्राप्त होताच गेल्या दोन महिन्यांपासून एनसीबीचे अधिकारी संबंधित माहितीची शहानिशा करत होते. अखेर या अधिकाऱ्यांना या आंतरराज्य गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे.

11 एप्रिल 2026 रोजी याच पथकाने अशाच प्रकारे 210 किलो गांजाचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी चार मुख्य आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यावेळी वापरलेली गुन्ह्यांची पद्धत यावेळेस वापरण्यात आली होती. कोणालाही संशय येऊ नये म्हणून या तस्करांनी किराणा मालाच्या वस्तूमध्ये गांजा लपवून आणला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT