Mumbai Local Train Megablock Pudhari
मुंबई

Mumbai Local Train Block: ट्रान्स हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक; लोकल सेवा ५ तास ठप्प

ठाणे-वाशी-नेरुळ दरम्यान वाहतूक विस्कळीत; मध्य रेल्वेची प्रवाशांना पूर्वसूचना

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेने अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी ट्रान्स हार्बर अप आणि डाऊन मार्गावर रविवार 22 मार्चला मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल पाच तासासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

कुठे : ठाणे-वाशी नेरूळ ट्रान्स हार्बर

कधी : रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10

परिणाम : ठाणे येथून 10.35 ते 16.07 वाजेपर्यंत वाशी, नेरुळ, पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल तसेच पनवेल, नेरुळ, वाशी येथून 10.25 ते 16.09 वाजेपर्यंत ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल रद्द असतील.

मरेवर आज मध्यरात्री ब्लॉक

ठाणे-डोंबिवली दरम्यान प्लॅटफॉर्मच्या विस्तार कामासाठी शनिवार मध्यरात्री 12 वाजल्यापासून रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळात मुलुंड ते ठाणे व दिवा ते डोंबिवली दरम्यान धीम्या गतीच्या मार्गावर ब्लॉक राहणार आहे.

मेल आणि एक्सप्रेस

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी व दादर येथून सुटणाऱ्या डाउन मेल आणि एक्सप्रेस ट्रेन्स विद्याविहार, ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या लाईनवर वळवण्यात येतील. सीएसएमटी, दादर येथे येणाऱ्या अप मेल आणि एक्सप्रेस ट्रेन्स कल्याण आणि ठाणे व विद्याविहार स्थानकांदरम्यान सहाव्या लाईनवर वळवण्यात येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT