गोरेगाव : एका नोटेऐवजी तीन नकली नोटा देणारे रॅकेट रायगड पोलिसांनी उघड केले आहे. गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत लाखापाले येथील आरोपीस तसेच अन्य दोन आरोपीमधील एक अटकास केली आहे. तर एक आरोपी फरार झाल्याची घटना रविवारी दाखल झाली. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व गोरेगाव पोलीस ठाणे यांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, गोरेगांव पोलीस ठाणे हददीतील टेमपाले गावच्या हददीत मुख्य आरोपीत एक मुफरिसर उर्फ मिन्नी अब्दुल रशिद खानदेशी, वय 47, रा. टेमपाले, ता. माणगांव, जि.रायगड यांचे घरी नकली चलनी नोटा ठेवल्या असून सदर आरोपीत मुख्य मुफरिसर दुसरा आरोपी सुनील बाळाराम मोरे, रा. निगडी. पो. पाबरे, ता. म्हसळा व तिसरा आरोपी मेहबुब उलडे, रा. बोर्ली, ता. श्रीवर्धन हे एक खरी चलनी नोट घेऊन तीन खोटया नोटया देत आहेत, अशी बातमी मिळाल्याने सदरची स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व गोरेगाव पोलीस ठाणे यांनी एकत्रित कारवाई करीत दोन आरोपीना अटक केली असून आरोपी मेहबूब उलडे हा फरार झाला आहे.
या कारवाईत आरोपी एक याच्या घरातुन पाचशेच्या चार तर दोनशेची एक खोटया चलनी नोटा ताब्यात घेतल्या असून सदर आरोपीच्या विरोधात गोरेगांव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे.
कोणत्याही अमिषाला बळी न पडता अशा प्रकारची कोणी खोट्या चलनी नोटा समाजात पसरवत असेल अथवा देत असतील तर त्यांनी सदर नोटा या नॅशनल बँक येथुन चेक करुन घ्याव्यात तसेच काही तक्रार असल्यास पोलीस ठाणे येथे संपर्क करावा व तसेच नागरिकांनी सतर्क रहावे, असे पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून आवाहन करण्यात आले आहे.